Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeजळगावसाळवे गावाच्या कन्येने विदेशात युध्दजन्य परिस्थितीत युक्रेनमध्ये लावला झेंडा

साळवे गावाच्या कन्येने विदेशात युध्दजन्य परिस्थितीत युक्रेनमध्ये लावला झेंडा

जळगाव/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- साळवे येथील रहिवासी व एरंडोल येथे जिजामाता कन्या विद्यालयातील निवृत्त शिक्षक सी.बी.पाटील सर यांची सुकन्या कु.कल्याणी पाटील हिने युक्रेन येथील विद्यापीठात एमबीबीएसची पदवी प्रथम श्रेणीत मिळवून विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून देशाचा,राज्याचा,जिल्ह्याचा आणि साळवे गावाचा मान उंचावली आहे. यशाचा झेंडा रोवला. म्हणून ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉ. गिरीश नारखेडे, खजिनदार डॉक्टर चंद्रकांत नारखेडे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर शशिकांत नारखेडे आणि साळवे इंग्रजी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.एस. पाटील ,सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. कल्याणी पाटील हिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या