जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- सावदा येथील दानशूर व्यक्ती, माजी नगराध्यक्ष रवींद्र विष्णू पाटील यांचे वयाच्या ८० व्या वर्षी गुरुवार दुपारी एक वाजता पुणे येथे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या शुक्रवार सकाळी दहा वाजता त्यांच्या राहते घर पाटील पुरा येथून निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा,पुतणे, पुतण्या पत्नी,सून असा परिवार आहे. ते अमोल रवींद्र पाटील यांचे वडील तर मनोज वसंतराव पाटील यांचे काका होत.सावदा आणि पंचक्रोशीत त्यांनी अनेकांना सढळ हाताने मदतीचा हात दिला असून अनेक वर्षे ते सावदा नगरपरिषदेचे अध्यक्ष राहून चुकले असून शहराच्या विकासासाठी अनेक महत्वकांक्षी प्रकल्प त्यांनी उभारून विकासात भर घातली आहे.
सावदा येथील माजी नगराध्यक्ष व दानशूर व्यक्तिमत्त्व रवींद्र पाटील निवर्तले
RELATED ARTICLES