Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यासिंदखेडराजा तालुक्यात बस-कंटेनरचा भीषण अपघात; 5 प्रवाशांचा मृत्यू, 13 प्रवासी गंभीर जखमी

सिंदखेडराजा तालुक्यात बस-कंटेनरचा भीषण अपघात; 5 प्रवाशांचा मृत्यू, 13 प्रवासी गंभीर जखमी

बुलढाणा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- बुलडाणा  वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे, त्यात बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. यात बसमधील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, इतर १३ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला आहे,परिसरात एकच शोककळा पसरली आहे.दरम्यान, मृतांमध्ये बसचालकाचाही समावेश आहे. अपघातातील सर्व जखमींना सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात होताच घटनास्थळी पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी धाव घेतली व बचावकार्य सुरू केले.

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का गावाजवळ मुंबई-नागपूर महामार्गावर हा अपघात झाला. मेहकर आगाराची बस ही पुण्यावरून मेहकरकडे जात असतांना पळसखेड चक्का गावानजीक कंटेनर आणि बसची समोरासमोर धडक झाली. ​​​​​​​​​​​​​​या धडकेमुळे बसचा समोरील भाग अक्षरश: चक्काचूर झाला. बसचे वरील पत्रेही उडाले. त्यामुळे बसमधील समोरील 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर, 13 जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अपघातातील सर्व जखमींना सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात होताच घटनास्थळी पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी धाव घेतली व बचावकार्य सुरू केले. दरम्यान, या अपघातामुळे मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी काही वेळाने वाहतूक सुरळीत केली.या भीषण अपघाताने परिसर शोकाकुल झाला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या