Sunday, July 13, 2025
police dakshta logo
HomeUncategorizedसिद्धगंगा नदी पात्रात १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

सिद्धगंगा नदी पात्रात १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

बुलडाणा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- खामगाव तालुक्यातील ढोरपगाव येथील. रानात गाय पाहण्यासाठी गेलेला तेरा वर्षीय मुलगा नदीपात्रात बुडून मरण पावल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील ढोरपगाव येथे उघडकीस आली आहे.जय विठ्ठल तायडे वय वर्ष १३ राहणार ढोरपगाव तालुका खामगाव असे नदीपात्रात बुडून मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे. जय हा संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान शेतात गाय पाण्यासाठी गेला होता, बराच वेळ झाला तरी तो घरी परतलाच नाही.शेवटी जयच्या घरातील मंडळींनी गावकऱ्यांनी त्याचा रात्रभर सर्वत्र शोध घेतला तरीही जय मिळून आला नाही. त्याचा रात्रभर सर्वत्र शोध घेतला. अखेर सकाळी सहा वाजताच्या दरम्यान भालेगाव बाजार तालुका खामगाव येथील सिद्धगंगा नदी पात्रात जयचा मृतदेह मिळून आला आहे. नदीला पूर आल्यामुळे जय त्यामध्ये वाहून गेला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. भिकाजी काशीराम तायडे वय 50 राहणार ढोरपगाव तालुका खामगाव यांनी तशी तक्रार पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल इंगळे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या