Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यासीना नदीच्या हद्द निश्चितीची माेहीम सुरू; ३५ हजार बांधकामे अडचणीत येणार ;...

सीना नदीच्या हद्द निश्चितीची माेहीम सुरू; ३५ हजार बांधकामे अडचणीत येणार ; महापालिका प्रशासन

 

अहमदनगर/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- शहरातून वाहणाऱ्या सीना नदीचे पात्र व पूररेषेची निश्चितीबाबत जलसंपदा‎ अधिकाऱ्यांच्या मदतीने महापालिकेने नकाशानुसार‎ प्रत्यक्ष मोजणी करून हद्द निश्चितीची मोहीम सुरू केली‎ आहे. नव्याने निश्चित केलेल्या या पूररेषेत सुमारे ३० ते ३५‎ हजार बांधकामे अडचणीत येण्याची‎ शक्यता आहे. दरम्यान, यापुढे पूररेषेत बांधकामांना‎ परवानगी दिली जाणार नाही, असे आयुक्त डॉ. पंकज‎ जावळे यांनी सांगितले.‎

अहमदनगर शहरात सीना नदीचे १४ किलोमीटरचे पात्र आहे.‎ कुकडी पाटबंधारे विभागाने‎ खासगी एजन्सीची नियुक्ती करून २०२१ मध्ये महापालिकेला नकाशे सादर केले हाेते. आता दाेन वर्षांनंतर प्रशासनाला जाग येऊन हद्द व पूररेषेची अंमलबजावणी सुरू आहे. नागापूर‎ येथील पुलापासून हे काम सुरू करण्यात आले आहे.‎ सीना नदीपात्राची हद्द व पूररेषा‎ याबाबत अनेक वर्षांपासून संभ्रम‎ होता.
यापूर्वीच्या काळात‎ महापालिकेने पूररेषेच्या खुणाही‎ केल्या होत्या. मात्र, आता कुकडी‎ पाटबंधारे विभागाने अधिकृतपणे हद्द‎ व पूररेषा निश्चित केली आहे.‎ दरम्यानच्या काळात नदीलगतच्या‎ परिसरात शेकडो लेआऊट मंजूर‎ झाले, याबाबत प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणे गरजेचे आहे.या निर्णयामुळे अनेक जण चिंतेत पडलेले दिसून आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या