Thursday, September 19, 2024
police dakshta logo
HomeUncategorizedसुट्टीवर आलेल्या कुरघोटच्या भारतीय सैन्यदलातील जवानाचे हृदय विकाराने निधन

सुट्टीवर आलेल्या कुरघोटच्या भारतीय सैन्यदलातील जवानाचे हृदय विकाराने निधन

सोलापूर/जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील/पोलीस दक्षता लाईव्ह:- सुट्टीवर आपल्या कुरघोट गावी आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवानाचे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. वीर जवान अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा देत सायंकाळी कुरघोट येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. महेश बिराप्पा सलगरे (वय २६) राहणार कुरघोट (ता. दक्षिण सोलापूर) निधन झालेल्या तरुण जवानाचे नाव आहे. महेश सलगरे हा जवान भारतीय सैन्य दलात नोव्हेंबर २०१६ मध्ये भरती झाला होता. जम्मू-काश्मीरमध्ये सेवेत होता. आठ दिवसा खाली तो सुट्टीवर आला होता. सुट्टीवर येण्यापूर्वी मात्र त्याची झांसी येथे बदली झाली होती. येत्या २७ जूनला तो तेथे रुजू होणार होता. सोलापुरातील घरी असताना अचानक त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. कुरघोट गावाने एक तरुण भारतीय वीर जवान गमावल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सायंकाळी पाच वाजता कुरघोट या गावी त्यांचे पार्थिव आणण्यात आले. तेव्हा प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सैनिक कल्याण केंद्राचे अधिकारी यांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर महेश यांच्या काकाने त्यांच्या चितेला अग्नी दिली. यावेळी सरपंच पुतळाबाई नेकनारे, माजी सरपंच बनसिध्द बन्ने, भागाण्णा आटकर यांच्यासह ग्रामस्थ तरुण उपस्थित होते.

महेश सलगरे यांचा जन्म १९९७ मध्ये येळगी (ता. मंगळवेढा) येथे झाला होता. तेथेच प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर आठवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण बालाजीनगरला येथे झाले होते. दरम्यान वडिलांच्या निधनानंतर कुरघोट या आपल्या आईच्या गावी ते कुटुंबासह राहण्यास आले होते. महेश सलगरे यांचा सहा महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या