जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव येथील वेग वेगळ्या भागातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच संभाजी नाट्यगृहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी सौ.हेमाताई अमळकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या वेळेस त्यांचे स्वागत सुधर्माच्या वतीने श्री.सूर्यकांत हिवरकर यांनी अशोक वृक्षाचे रोप देऊन केले. कार्यक्रम प्रास्ताविकात श्री.हेमंत बेलसरे यांनी सुधर्माच्या कामाची माहिती दिली. सौ.हेमा ताई अमळकर यांनी कार्यक्रमाला उपस्थित मुलांशी संवाद साधला आपण आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुढे गेलेच पाहिजे असे सांगून स्वतःच्या जीवनातील काही उदाहरण देऊन मुलांना मार्गदर्शन केले..तसेच पाढे कसे पाठ करावे.हे मुलांना उदाहरण देऊन समजवून सांगितले. दररोजचा अभ्यास करतांना कशा पद्धतीने करावा हे सर्व मुलांना सोप्या भाषेत लक्षात आणुंन दिले. काही मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील त्यांनी सोप्या भाषेत दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दप्तर, वही, रंगपेटी, चित्रकला वही,कंपास, पेन, पेन्सिल, शॉपनर इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच बिस्किट, चिवडा, कॅडबरी या खाऊचे वाटप करण्यात आले. सुधर्मा संस्थेचे कार्य अतिशय गौरवास्पद आहे असे मत सौ. हेमा ताई अमळकर यांनी व्यक्त केले. साहित्य मिळाल्याने मुले खूप आनंदात होती. कार्यक्रमाचे आभार सुधर्माचे वतीने सौ.सुनीता बेलसरे यांनी मानले कार्यक्रमास सावखेडा बुद्रुक, खेडी खुर्द, समता नगर, आंबेडकर नगर,गोपाळपुरा, मन्यारखेडा, तांबापुरा येथील गरजू आणि गरीब विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमा साठी श्री अक्षय जोशी, अमिषा डाबी मॅडम, स्वाती कुलकर्णी व सुरभी महिला मंडळ यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल सोनवणे, नितीन तायडे, शुभम राखपसारे, प्रियंका पवार, सुवर्णा मराठे,नाना चव्हाण, दिनकर बाविस्कर यांनी सहकार्य केले.
सुधर्माच्या वतीने 150 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
RELATED ARTICLES

