अहमदनगर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2022 च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. इशिका किशोर हिने UPSC परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. राज्यातही UPSC परीक्षेत मुलींचाच डंका पाहायला मिळाला. अहमदनगरच्या डॉक्टर शुभांगी पोटे हिनेही सासूचा कानमंत्र ऐकून इतिहास घडवला आहे. संपूर्ण राज्यभर डॉक्टर शुभांगी पोटे हिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२२ परीक्षेत मुलींचा डंका पहायाला मिळाला. अहमदनगर शहरातील डॉक्टर शुभांगी पोटे हिने यूपीएससी स्पर्धेत पाचशे तीस क्रमांक मिळवून या परीक्षेत यश मिळवले आहे. डॉक्टर शुभांगी पोटे हिने कोणत्याही क्लासची अथवा स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या अकॅडमीची मदत न घेता स्वत:च्या अभ्यासावर यश संपादन केलं आहे. शुभांगीचे सासू-सासरे घर प्रपंच आणि सहा वर्षाच्या मुलाला सांभाळत या परीक्षेत यश मिळवले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२२ परीक्षेत मिळवलेल्या यशावर डॉ. शुभांगी म्हणाली, ‘मनात फक्त जिद्द ठेवली होती. त्याचबरोबर सासूने दिलेला कानमंत्र तो म्हणजे मी माझ्या काळात शिकले नाही. मात्र, तू शिकून पुढे जा’. ‘मी हा मंत्र मनात ठेवून अभ्यास करत राहिले. लहान मुलाला सांभाळायला पतीने जबाबदारी घेतल्यामुळे आणि प्रोत्साहन दिल्यामुळे हे यश प्राप्त झाले’, असेही ती म्हणाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२२ परीक्षेत यश मिळाल्याचा आनंद डॉ. शुभांगीच्या चेहऱ्यावर दिसत होता.