मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
जळगाव/कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव खानदेशातील सुप्रसिद्ध गायिका गोड गळ्याची धनी ज्योती केदारे ( मालेगाव ) यांचं हृदयविकाराने नुकतच निधन झाले असून संगीत क्षेत्रातील चाहत्यांना आणि कलावंतांना यामुळे मोठा धक्का बसला आहे.
कलाकार ज्योती केदारे ही गेल्या 20 ते 24 वर्षांपासून गायन क्षेत्रात कार्यरत होत्या ,अतिशय मधुर असा आवाज असल्याने रसिक-प्रेक्षकांना तिने भुरळ घातली होती.
नाशिक,अहमदनगर, औरंगाबाद ,मालेगाव ,बुलडाणा ,जळगाव ,धुळे आणि बऱ्हाणपूर, खंडवा येथे तिचे सातत्याने ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम होत असत.
सूर ज्योती या नावाने तिचा एक म्युझिकल ग्रुपही होता. गायनाच्या क्षेत्रात ज्योती केदारे हिला अनेक पुरस्कार दिग्गजांच्या हस्ते मिळालेले आहेत.अनेक कार्यक्रमप्रसंगी ऑर्केस्ट्रात तुषार वाघुळदे यांनी आपल्या दमदार व खुमासदार आवाजात निवेदनही केले आहे.. स्वभावाने मनमोकळ्या आणि संगीत क्षेत्रातील अत्यंत अभ्यासू ज्योतीजी यांना पोलीस दक्षता लाईव्ह आणि कलाकार तुषार वाघुळदे मित्रपरिवार व ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशनतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.