संपादक चंदन पाटील मो. नं :- 9850168194
सोलापूर/जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील/पोलीस दक्षता लाईव्ह :- सोलापूर रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर स्वायत्त)येथे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने राज्यस्तरीय अंदाजपत्रक विश्लेषण 2023 या विषयावर पॅनल चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चेच्या उद्घाटनप्रसंगी बीज भाषण करताना प्रा. डॉ. एम. एस. देशमुख म्हणाले काही वर्षांपूर्वी सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा वाटा 55 टक्के इतका झाला होता. सद्यस्थितीत हा हिस्सा घटला असून तो 14 ते 15 टक्क्यावर आला आहे. त्यामुळे कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा राहिला नाही. त्यामुळे कृषी क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधांसह अन्य पूरक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. हा कार्यक्रम रुसा अनुदानातून राबविण्यात आला. ते पुढे म्हणाले 2018 पासून भारत हा तरुणांचा देश बनला आहे. 2060 पर्यंत या तरुणांना केंद्रभूत मानून केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केले आहेत. शासनाने पाश्चात्य देशाचा आदर्श घेऊन सार्वजनिक आरोग्य, शिक्षण व अन्य जीवनावश्यक सेवा बळकट करण्यासाठी आणखी भरीव तरतूद करण्याची गरज आहे. तरच मानव विकास निर्देशांकामध्ये भारताची प्रगती होऊ शकते.
या कार्यक्रमानंतर आयकर या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये चार्टर्ड अकाउंट पवन कुमार झंवर, अक्षय शहा व विजयकुमार क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
या उपक्रमात उद्योग आणि रोजगार, शिक्षण आणि महिला सबलीकरण, शेती आणि ग्रामीण विकास अशा विविध विषयावरील चर्चेत तज्ञ मार्गदर्शक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या चर्चासत्राचा समारोप्रसंगी माजी प्राचार्य डॉक्टर जे. जी. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी अर्थसंकल्पासारख्या गुंतागुंतीचा विषय विद्यार्थ्यांना समजावा या उद्देशाने ही चर्चा आयोजित केल्याचे स्पष्ट केले.त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अर्थसंकल्पातील बारकावे समजले असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत खिलारे उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. एम के गजधने प्रा. डॉ. एम. बी. अनंतकवळस डॉ.सुशील शिंदे डॉ. अमर कांबळे प्रा. बी.बी. शितोळे प्रा. दत्तात्रय काळेल आधी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कुबेर गायकवाड प्रा. सागर शिवशरण संतोष मते यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. शैलेंद्र सोनवले. प्रा.दत्तात्रय खिलारे प्रा. आप्पासाहेब चौगुले यांनी केले.