मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
सोलापूर/ जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील /पोलीस दक्षता लाईव्ह:- सोलापूरच्या विकासात आणि होटगीरोड विमानतळावरून नागरी विमानसेवेस प्रमुख अडथळा असलेली श्री.सिध्देश्वर सह साखर कारखान्याची को जनरेशनची चिमणी सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी अनाधिकृत बेकायदेशीर ठरवत, सदर चिमणी ४५ दिवसांत कारखाना प्रशासनाच्या वतीने पाडण्यात यावी अन्यथा सोलापूर महानगरपालिका ती पाडून सर्व खर्च कारखाना प्रशासना कडून वसुल करेल असा आदेश सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिला.
गेल्या अनेक महिन्यांपासून ह्या विषयासाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना वेळोवेळी ह्या बाबत पाठपुरावा केल्या मुळेच हा आशावादी निकाल दिल्याने सोलापूर विकास मंचच्या वतीने घोषित करण्यात आलेले महाराष्ट्र दिना दिवशीचे आक्रमक आणि तीव्र स्वरूपांचे आंदोलन संस्थिगित करण्याचा निर्णय शासकीय विश्रामगृह झालेल्या बैठकीत सोलापूर विकास मंचच्या वतीने घेण्यात आला. श्री.सिद्धेश्वर सह.साखर कारखान्याची को जनरेशनची अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडकाम ४५ दिवसांत झाले नाही तर सोलापूर विकास मंचच्यावतीने सोलापूरात भव्य स्वरूपांचे उद्रेकात्मक ऐतिहासिक जनआंदोलन उभारण्यात येईल तसेच सर्वोच्च न्यायालयात भारतातील अत्यंत दिग्गज आणि प्रतिष्ठीत वकीलांच्या मार्फत जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती सोलापूर विकास मंचच्या वतीने बैठकीत देण्यात आली. सोलापूर विकास मंचच्या वतीने होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवरील संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकार्यांच्या समवेत बैठक, चर्चा आणि निवेदनांची अनेकवेळा अदान प्रदान करण्यात आले आहे आणि सातत्याने पाठपुरावा देखील करुनही आजतागायत सोलापूरांना विमानसेवे पासून वंचित राहावे लागत असल्याची खंत ह्यावेळी व्यक्त करण्यात आली.
सोलापूर विकास मंचच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरच्या विकासाशी निगडित महत्त्वपूर्ण विषयांवर केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर अभ्यासपूर्ण आणि सातत्याने पाठपुरावा करुन सोलापूरकरांच्या समस्या सोलापूर विकास मंचच्या वतीने शासनाकडून सोडवुन घेत आहेत. होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा हा सोलापूरकरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असुन केंद्र सरकारच्या वतीने वेळोवेळी ह्या बाबत राज्य शासनाला मार्गदर्शक सूचना आणि आदेश पारित केले आहे.आजतागायत होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू झाली नसल्याने सोलापूरकरांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे, आणि लाखो तरुणांना नोकरी आणि व्यवसाया निमित्त कायमस्वरूपी सोलापूर सोडून जाण्यास नाइलाजास्तव भाग पडले असल्याची कैफियत सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी बैठकीत मांडली.