Thursday, September 19, 2024
police dakshta logo
HomeUncategorizedस्व.नारायण पाटील फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम

स्व.नारायण पाटील फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव-स्वर्गीय नारायण पाटील फाऊंडेशन व न्यु इंग्लिश स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने नशिराबाद येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. शाळेच्या स्काऊट गाईड विभागाच्यावतीने नशिराबाद वाघूर कॉलनी ते लक्ष्मी माता मंदिर रोडच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. लावलेल्या दीडशे रोपांच्या संगोपनाची जबाबदारी स्व.नारायण पाटील फाऊंडेशन घेणार असल्याचे यावेळी पदाधिकारी यांनी सांगितले.यापूर्वी देखील सुनसगाव रस्त्यावर फाऊंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले होते.वृक्षारोपण दरम्यान कडुलिंब,बेहडा आणि वड आदी रोपांची लागवड करण्यात आली आहे.वृक्षारोपण संवर्धनसाठी हा रस्ता दत्तक घेण्यात आला आहे. या पर्यावरण विषयक कार्यक्रमप्रसंगी नशिराबाद नगर परिषदचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे,फाऊंडेशन चे अध्यक्ष योगेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, सहायक पोलीस निरीक्षक रामनाथ मोताळे, नशिराबाद शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.संदीप महाजन,जनार्दन माळी, विनायक वाणी, प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्राच्या मंगला दीदी, दीपा दीदी, राजू पाचपांडे, जितेंद्र महाजन, न्यु इंग्लिश स्कुलचे स्काऊट गाईड चे विद्यार्थी -विद्यार्थिनी,स्काऊट मास्तर श्री.सावकारे, शाम कुमावत,गाईड कॅप्टन व्ही.डी. बोंडे,एस.बी.रत्नपारखे, शाळेच्या मुख्याध्यापिका एस.ए. बनसोडे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुदाम धोबी, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण पाटील, डॉ.प्रमोद अमोदकर आदींची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या