Sunday, July 13, 2025
police dakshta logo
Homeजळगावस्व.हर्षल नन्नवरे यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा

स्व.हर्षल नन्नवरे यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- स्वर्गीय हर्षल नन्नवरे यांच्या स्मरणार्थ मोफत रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळा सायंकाळी पार पडला. एक सामाजिक बांधिलकी व निस्वार्थपणे रुग्णसेवा व्हावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. या सेवाप्रसंगी उपस्थित जळगाव शहराचे माजी उपमहापौर डॉ. अश्विन शांताराम सोनवणे,आणि ज्यांनी रुग्णवाहिका दिली ते भिकन नन्नवरे, रवी ठाकरे, मोहन शंकपाळ ,भगवान सोनवणे, भैया शंकपाळ, जॉन कोळी,राहुल कोळी,भरत सपकाळे आणि इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी उपमहापौर डॉ.सोनवणे यांनी नन्नवरे परिवाराचे कौतुक करून अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या