Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमहद्दपार गुन्हेगारासह एकाला सिंधी कॉलनीत शस्त्रांसह केली अटक

हद्दपार गुन्हेगारासह एकाला सिंधी कॉलनीत शस्त्रांसह केली अटक

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव विविध प्रकारचे शस्त्र बाळगण्याचे अनेक प्रकार गेल्या आठवड्यात उघडकीस आले असून अनेक आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे,अशातच जळगाव शहरात हद्दपार गुन्हेगारासह एकास धारदार शस्त्रांसह एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी शिताफीने अटक केली आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर संजय भालेराव यांनी फिर्याद दिली आहे. जुनेद शेख उर्फ बवाली युनूस शेख (वय २६, रा. बिलाल चौक, तांबापुरा) हा जळगाव जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार आहे,तो सिंधी कॉलनी रस्त्यावरील कंवरनगर पोलीस चौकी परिसरात २० मे रोजी ८ वाजेच्या सुमारास दुसरा संशयित आरोपी रहीम शेख सलीम (वय २८, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) यांचेसह पोलिसांना मिळून आला. रहीम शेख यांचेकडे कमरेला लोखंडी लहान तलवार मिळून आली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर भालेराव यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस नाईक सचिन मुंढे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या