Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याहरताळा येथे दर्शनासाठी निघालेल्यांवर काळाचा घाला; पती जागीच ठार,पत्नी जखमी

हरताळा येथे दर्शनासाठी निघालेल्यांवर काळाचा घाला; पती जागीच ठार,पत्नी जखमी

भुसावळ/कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. हरताळा येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भुसावळातील दाम्पत्याच्या दुचाकीला फुलगावजवळ राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे, ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. ललित प्रभाकर नेमाडे (भुसावळ) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नेमाडे हे भुसावळातील नवमहाराष्ट्र स्टोअर्सचे संचालक आहेत. नेमाडे हे सर्वांमध्ये समरस होत होते ,स्वभावाने मोकळे होते,काळाने घाला घातल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

भुसावळातील नवमहाराष्ट्र स्टोअर्सचे संचालक ललित प्रभाकर नेमाडे हे आपल्या पत्नीसह शुक्रवारी हरताळा येथे देवदर्शनासाठी जात असताना वरणगाव राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना फुलगाव उड्डाण पुलाजवळ महामार्गावरील दुभाजकावर त्यांची दुचाकी जोरदार आदळली ,त्यात त्यांचा मृत्यू ओढवला. ललित प्रभाकर नेमाडे (४८, भुसावळ) यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या पत्नी श्रीमती नीता ह्या जखमी झाल्याचे सांगण्यात आले, मात्र प्रत्यक्षात नेमका अपघात कसा झाला याची अद्याप स्पष्ट झाले नाही.अपघाताची माहिती कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव पोलिसांनी धाव घेतली. श्रीमती नेमाडे यांना तात्काळ उपचारार्थ हलवले तर ललित नेमाडे यांचा मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. पुढील तपास वरणगाव पोलीस करीत आहेत.या अपघाताने परिसरात एकच शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या