Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमहे तर अजबच..!!..पत्नी नांदायला येत नाही, पतीने केले शालकाचे अपहरण..!

हे तर अजबच..!!..पत्नी नांदायला येत नाही, पतीने केले शालकाचे अपहरण..!

पाचोरा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- पाचोरा तालुक्यात एक अजबच घटना घडली आहे.नगरदेवळा सिम येथील पत्नी नांदायला येत नसल्याने पतीने चक्क शालकाचे अपहरण केल्याची घटना दि. २९ मे रोजी घडली. दरम्यान पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री. खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी विश्वास देशमुख यांनी अथक परिश्रम घेत अपहरणकर्त्यास पकडून त्याच्या ताब्यातील बालकास सुखरुप बहिणीकडे सुपुर्द केले आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील नगरदेवळा सिम येथील सासर असलेला धनराज जगन्नाथ पाटील रा. साकोरा ता. नांदगाव जि. नाशिक यांची पत्नी गेल्या एक महिन्यापासून नांदायला येत नसल्याने धनराज पाटील याने दि. २९ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास रामानंद नगर, पाचोरा येथील लग्नसमारंभातुन सुरेखा दीपक रणदिवे हिचा भाऊ गौतम दिपक रणदिवे (वय – ७ वर्ष) यास अपहरण करून घेवून गेला होता. दरम्यान सुरेखा रणदिवे यांच्या फिर्यादीवरून धनराज पाटील यांच्याविरुध्द पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल विश्वास देशमुख यांनी गौतम याचा साकोरा ता. नांदगाव येथे शोध घेतला असता त्याठिकाणी धनराज व गौतम हे आढळून आले नाही. दरम्यान पोलिस कॉन्स्टेबल विश्वास देशमुख यांनी धनराज पाटील यांचे मोबाईल लोकेशन घेतले असता लोकेशन हे मनमाड येथील दाखवत असल्याने विश्वास देशमुख यांनी मनमाड गाठले,आणि पोलिसांनी लोकेशन घेतले असता लोकेशन हे मनमाड येथील दाखवत होते. विश्वास देशमुख यांनी काही वेळातच मनमाड गाठले. मनमाड शहरात मोबाईल लोकेशनद्वारे तपास अवघड होत असतांना देशमुख यांनी मनमाड येथील माजी नगरसेवक अमिन पटेल, सिव्हील कॉन्ट्रक्टर निलेश कमोदकर, रा. काँ. शहर उपाध्यक्ष जाविद शेख, समाज सेवक बबलु काजी, तांबोली समाज शहर उपाध्यक्ष मुश्ताक तांबोली, नाशिक पोलिस सदाशिव देशमुख यांना गौतम व धनराज यांचे फोटो दाखवून शोध कार्य सुरू केले. धनराज व गौतम हे मनमाड शहराच्या एका गल्लीत सापडले.पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या