संपादक चंदन पाटील मो.नं:-9850168194
रावेर/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:-रावेर तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली असून आरोपी तरुणाने १३ वर्षीय अल्पवयीन मुलगीवर जबरदस्तीने वारंवार शारीरीक संबंध केल्याने त्या अत्याचारातून मुलगी ७ महिन्यांची गर्भवती राहिल्याची घटना समोर आली आहे.
प्राथमिक माहिती अशी की पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार सात महिन्यांपूर्वी मुलगी घरी एकटी असताना तीच्या सोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. याबाबत कोणास काही सांगीतले तर तुझी बदनामी करेल व तुला जिवे ठार मारेल कुणाला पत्ताही लागू देणार नाही अशी धमकी दिली. त्या मुळे पिडीतेने घाबरून जाऊन याची कोठेही वाच्यता केली नाही.अधून मधून संधी साधून आरोपीने पुन्हा दोन ते तीन वेळा मुलीवर जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रथापित केले. त्यानंतर पीडितेचा भाऊ ऊस कामगार असल्याने मुलगी तीच्या भाऊ सोबत ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेली होती. बाहेरगावाहून १५ दिवसापूर्वी गावी परत आल्यावर पिडीतेचा पोटाचा आकार वाढत असल्याने तिच्या नातेवाईकांनी तिला सामान्य रुग्णालयात दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी तपासून पीडिता ७ महीन्याची गर्भवती असल्याचे सांगीतले. याप्रकरणी संशयित आरोपी तरूणा विरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उप निरी.दिपाली पाटील या करीत आहेत.