जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- ऑनलाईन बेटिंग व जुगार अॅप्सकडून “100 टक्के कॅशबॅक”, “डबल रिटर्न” यासारख्या आकर्षक ऑफर्सच्या माध्यमातून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. सुरुवातीला विश्वास संपादन करून पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले जाते. मात्र एकदा पैसे टाकल्यानंतर संबंधित रक्कम अडकते आणि ना परतावा मिळतो, ना कोणतीही जबाबदारी घेतली जाते.अशा फसव्या अॅप्समुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडत असून मानसिक तणावही वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता अशा संशयास्पद ऑनलाईन बेटिंग, जुगार अॅप्सपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
तसेच कोणतीही संशयास्पद लिंक, ऑनलाईन बेटिंग ऑफर किंवा आर्थिक फसवणुकीचा प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. स्वतःची व कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता जपण्यासाठी नागरिकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

