Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्या12 वी चा निकाल: राज्याचा 91.25 टक्के; कोकणची सरशी...

12 वी चा निकाल: राज्याचा 91.25 टक्के; कोकणची सरशी…

मुंबई/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मुंबई महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल राज्यनिहाय निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. आज (ता. 25 मे) सकाळी 11 वाजता बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली. यंदाच्या वर्षी सुद्धा बारावीमध्ये कोकण मंडळाने बाजी मारत सर्वाधिक टक्केवारी मिळवली आहे. तर नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बारावीच्या परिक्षेत बाजी मारली आहे. यंदाच्या वर्षी राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले होते. त्यामुळे राज्याचा एकूण निकाल हा 91.25 टक्के लागला आहे. तर गेल्या वर्षीपेक्षा 2.97 टक्क्यांनी निकाल घसरल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याकडून देण्यात आलेली आहे. यावर्षी परीक्षेला 14 लाख 28 हजार 194 विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी करण्यात आलेली होती. यातील 14 लाख 16 हजार 371 प्रत्यक्ष विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यांतील 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

बारावीच्या परीक्षेत नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 93.73 टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल 89.14 टक्के इतका लागला आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा पाच टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 4.59 टक्के अधिक मुली यावर्षी उत्तीर्ण झाल्या आहेत हे विशेष…! यंदाच्या वर्षी बारावीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आलेली होती. त्यामुळे विभागनिहाय निकालाची टक्केवारी पाहता कोकण विभाग अव्वल स्थानी आहे. मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के लागला असून मुंबईचा निकाला 88.13 टक्के लागला आहे. तर 154 विषयांपैकी 23 विषयांचा 100 टक्के निकाल लागला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या