मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
रावेर/कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- रावेर तालुक्यातील पाल जवळील सुमारे 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या निमड्या येथे एका अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. या घटनेमुळे रावेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
रावेर पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की ,रावेर तालुक्यातील निमड्या या गावात एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली. संजय बारेला ( वय ३१ रा.निमड्या ) असे खून झालेल्याचे नाव आहे,अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
संजय बारेला याचा खून कोणी आणि का केला ? याबाबत तर्कवितर्क केले जात आहे.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक कैलास नगरे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे आणि रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.
नेमका हा खून कोणी केला व कोणत्या
कारणासाठी केला आहे ? याबाबत चौकशीला
सुरुवात करण्यात आली आहे. घटनास्थळी डॉग स्कॉड व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. यासंदर्भात
रावेर पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.
मयताच्या खुनाचे कारण अस्पष्ट आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती ,परिसरात भीतीचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लवकरच खुनी हाती लागेल असा कयास पोलिसांनी व्यक्त केला असून पुढील तपास सुरू आहे.