यावल/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- यावल(मालोद) येथे १७ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेत अपहरण केल्याची घटना घडली असून ती अल्पवयीन मुलगी रावेर येथून तालुक्यातील यावल तालुक्यात आपल्या नातेवाईकांकडे आली असता सदर घटना घडली.
सविस्तर वृत्त असे की, कांडवेल तालुका रावेर येथील मूळची रहिवाशी असलेली अल्पवयीन सतरा वर्षीय मुलगी मालोद तालुका यावल येथे आपल्या भावाकडे आली असता या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून तिला पळवून नेत तिचे अपहरण केले, सदरचा प्रकार पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्याने अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात यावल पोलिसस्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

