महाराष्ट्र दिनाच्या दिवशी उपोषण
नाडगाव येथील नागरिकांकडून घनकचरा प्रकल्पाबाबत उपोषणाला सुरुवात
बोदवड/विशेष प्रतनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- तालुक्यातील नाडगाव येथील गट क्रमांक १९५ क्षेत्र ११ हेक्टर ४७ आर ही जागा नाडगाव ग्रामपंचायतच्या मालकीचे आहे, ३ हेक्टर जागाही देण्याच्या आदेश केलेले असताना सुद्धा चुकीच्या पद्धतीने १९५ क्षेत्रामधील ११ हेक्टर ४७ आर पूर्ण जागा नगरपंचायतच्या प्रकल्पासाठी देण्यात आलेली आहे, मात्र बोदवड नगरपरिषदेने जिल्हाधिकारी कडे चुकीचे,खोटे कागदपत्रे देऊन या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनाचे काम करण्याची परवानगी मिळवली. याप्रकरणी उपसरपंच गणेश पाटील व ग्रामस्थ नायब तहसीलदार संध्या सूर्यवंशी यांना निवेदन देऊन १ मे रोजी आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी चुकीच्या पद्धतीने ११ हेक्टर ४७ आर जागा संपादित केल्याने बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
नाडगाव ग्रामपंचायतने ग्रामसभा घेऊन या प्रकल्पाला विरोध केला आहे, याबाबत ३ डिसेंबर २०१९ रोजी जळगाव जिल्हाधिकारी, बोदवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना पत्राद्वारे कळवली होते तरीही परिषद येथे घनकचरा प्रकल्पाचे परवानगी मिळाली,त्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. सरपंच पती श्रीकृष्ण लासुनकर, उपसरपंच गणेश पाटील,गजेंद्र बढे, सोमेश्वर पाचपांडे,अर्जुन आसणे,सुभाष इंगळे,धनराज गायकवाड, श्रीकृष्ण धांडे,सुमेर पाटील,उमेश नेमाडे,नरेंद्र कुरपाडे,अरूण धांडे,विजय झांबरे, वासुदेव धांडे,राजेंद्र पाटील,किशोर भंगाळे, सह गावकरी नागरिक आमरण उपोषणाला बसलेले आहे.
१) संबंधित ग्रामपंचायतच्या दप्तरांमध्ये याबाबतच्या ठराव नामंजूर
संबंधित ग्रामपंचायतच्या दप्तरांमध्ये याबाबतच्या ठराव नामंजूर केलेला असून सुद्धा प्रकल्प मंजूर झाला कसा याबाबत सविस्तर विभागीय आयुक्त यांनी चौकशी करून यामध्ये सामील तत्कालीन सरपंच तसेच ग्रामसेवक यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा गावकरी करीत आहे.
सामाजिक वनीकरण अंतर्गत याच ठिकाणी केली आहे वृक्ष लागवड
गट क्रमांक १९५ मध्ये सामाजिक वनीकरण परिक्षेत्र बोदवड या कार्यालयामार्फत सन २०१८- २०१९ यामध्ये वृक्षारोपण लागवड केलेली आहे,याबाबतचा ठराव ग्रामपंचायतीने दिलेला आहे ही झाडे आता ३ वर्षाची पुर्ण झालेले असून लाखो रुपये खर्च करून ग्रामपंचायत तिकडे हस्तांतर करण्यात आलेली आहे व सामाजिक वनीकरण यांनी तसा पत्र व्यवहार सुद्धा केलेला आहे मात्र घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पामुळे या झाडांचे व नैसर्गिक आपत्तीच मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे व या शिवारातील शेतकरी यांची जमीन सुद्धा सुपीकता होईल व नागरिकांना आरोग्याचा धोका होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असा आक्षेप आहे.
संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल तहसीलदार पंकज लोखंडे यांनी आदेश क्र.प्र.क.३७/२०२० दिनांक २९/०७/२०२१ केलेला आदेनाद्वारे नगरपरिषद बोदवड यांना घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला जागा देण्यात आला आहे.