Wednesday, October 22, 2025
police dakshta logo
Homeक्राईम२५ किलो गांजासह एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

२५ किलो गांजासह एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

गांजाची अवैध लागवड उघड ; रावेर तालुक्यातील सहस्त्रलिंग येथे कारवाई

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करी व सेवनाच्या घटनांना आळा बसावा, यासाठी पोलीस अधीक्षक मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने कारवाया सुरू आहेत. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने रावेर तालुक्यातील सहस्त्रलिंग येथे धाड टाकून तब्बल २५ किलो वजनाचा, अंदाजे १ लाख ७० हजार रुपयांचा गांजा जप्त केला असून, या प्रकरणात एक आरोपीला अटक करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली की, रावेर तालुक्यातील सहस्त्रलिंग गावातील एका इसमाने आपल्या शेतात गांजासदृश अंमली पदार्थाची बेकायदेशीर लागवड केली आहे. त्यानंतर पोउपनिरीक्षक श्री. सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले. सदर पथकाने मिळालेल्या माहितीची खात्री करून तातडीने घटनास्थळी धाड टाकली असता, शेतात अवैधरित्या लागवड केलेला गांजा आढळून आला. तपासादरम्यान २५ किलो वजनाचा कैनाबीस (गांजा) असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदर शेतमालकास अटक करण्यात आली असून त्याची ओळख महेरबान रहेमान तडवी (वय ३२ वर्षे, रा. सहस्त्रलिंग, ता. रावेर) अशी आहे. आरोपीकडून मिळालेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध रावेर पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. ४२२/२०२५, NDPS कायदा १९८५ चे कलम ८(क), २०(ब)(२)(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल बडगुजर (फैजपूर उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक श्री. विशाल जयस्वाल (रावेर पोलीस स्टेशन), पोउपनिरीक्षक श्री. सोपान गोरे, पोहवा संदीप चव्हाण, यशवंत टहाकळे, पो.अं. प्रदीप सपकाळे, बबन पाटील, सचिन घुगे, मयूर निकम, भरत पाटील (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांचा सहभाग होता.तसेच रावेर पोलीस स्टेशनकडून सपोनि श्रीमती मीरा देशमुख, पोहेको ईश्वर चव्हाण, पो.अं. संभाजी बीजागरे, राहुल परदेशी यांनीही कारवाईत महत्त्वपूर्ण योगदान दिले. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनिरीक्षक मनोज महाजन (नेम. रावेर पोलीस स्टेशन) हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या