Saturday, November 16, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्या२८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा...

२८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात येणार…

मुंबई/ मुख्य संपादक चंदन पाटील/ पोलीस दक्षता लाईव्ह:- केंद्रीय दक्षता आयोगाने जाहीर केल्यानुसार २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. २८ रोजी सकाळी ११ वाजता भ्रष्टाचार निर्मूलनाच्या प्रतिज्ञेने सप्ताहाची सुरुवात होणार आहे. कुणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी #भ्रष्टाचार करताना, भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुंबई विभाग, ९१, सर पोचखानवाला मार्ग, वरळी मुंबई येथे संपर्क करावा. तसेच टोल फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी क्रमांक ०२२-२४९२१२१२, अथवा संकेतस्थळ https://acbmaharashtra.gov.in/, ईमेल acbwebmail@mahapolice.gov.in, addlcpacbmumbai@mahapolice.in, फेसबुक www.facebook.com-maharashtra-ACB,, मोबाईल ॲप acbmaharashtra, ट्विटर @ACB_Maharashtrahttp, आणि ९९३०९९७७०० या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संदीप दिवाण, अपर पोलीस आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या