Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्या२९ महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला भरपगारी सार्वजनिक सुट्टी

२९ महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला भरपगारी सार्वजनिक सुट्टी

मतदानासाठी सवलत न दिल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाईचा इशारा!

मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीत नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी शासकीय कार्यालयांसह सर्व शैक्षणिक, औद्योगिक व वाणिज्यिक आस्थापनांना भरपगारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने अधिसूचना तसेच शासन परिपत्रक नुकतेच निर्गमित केले आहे. परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, मतदारांना मतदानासाठी आवश्यक ती सुट्टी किंवा सवलत न दिल्यामुळे मतदान करता आले नाही, अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्राबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे. लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महानगरपालिकांमध्ये बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या