Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeमहाराष्ट्रराज्य शासनाचा महत्वाचा निर्णय, आता शुक्रवारीही असणार सुट्टी...

राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय, आता शुक्रवारीही असणार सुट्टी…

मुंबई /पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- अनंत चतुर्दशी अर्थात गणेश विसर्जन आज गुरुवारी पार पडणार आहे. याच दिवशी ईद-ए-मिलाद हा सण देखील आहे. पण ईद दुसऱ्या दिवशी साजरी करण्याचं मुस्लीम समुदयानं जाहीर केलं आहे. त्यामुळं आज गुरुवार अनंत चतुर्दशीची सार्वजनिक सुट्टी आहेच पण आता शुक्रवारी ईदची सुट्टी जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळं गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस सार्वजनिक सुट्टी असणार आहे.

मुख्यमंत्री कार्यालयानं याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद-ए- मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे आज गुरुवारी, २८ सप्टेंबर होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचं योग्य व्यवस्थापन करणं पोलीस प्रशासनाला शक्य व्हावं म्हणून शुक्रवारी २९ तारखेला शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या