जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून चालू वर्षात १ हजार २०० कोटी रूपये वाटप करण्यात आली आहे. मागील वर्षी कर्जाची फक्त मुद्दल भरल्यानंतर त्यावरील व्याज माफ केले गेले होते.
दरम्यान त्याचप्रमाणे यावर्षीही एप्रिल २०२३ मध्ये नियमित कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी नियमितपणे ३१ मार्चपर्यंत कर्जाची मुद्दलची रक्कम कर्ज खात्यात भरल्यास त्याच्यावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, या सवलतीचा फायदा फक्त ३१ मार्च २०२३ पर्यंत भरणा केलेल्या शेतकऱ्यांनाच होणार आहे अशी माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.