Thursday, September 19, 2024
police dakshta logo
HomeUncategorizedमहसूल सप्ताह उपक्रमांतर्गत जनसंवादातून जास्तीत जास्त नागरिकांनी आपली प्रलंबित प्रकरणे व अपिले...

महसूल सप्ताह उपक्रमांतर्गत जनसंवादातून जास्तीत जास्त नागरिकांनी आपली प्रलंबित प्रकरणे व अपिले निकालात काढून घ्यावीत; उपायुक्त वैशाली कुंटवाल

सोलापूर /क्राईम रिपोर्टर खंडेराव पाटील पश्चिम महाराष्ट्र /पोलीस दक्षता लाईव्ह:– तालुका माळशिरस वेळापूर येथे महसूल विभागामार्फत एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान सुरू झालेल्या महसूल सप्ताह उपक्रमांतर्गत जनसंवादातून जास्तीत जास्त नागरिकांनी आपली प्रलंबित प्रकरणे व अपिले निकालात काढून घ्यावीत असे आवाहन रोजगार हमी योजनेच्या पुणे विभागीय उपायुक्त वैशाली कुंटवाल यांनी केले. त्या वेळापूर आणि पिलिव महसुल मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या लोकाभिमुख जनसंवाद उपक्रमांतर्गत वेळापूर येथील आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी चारुशीला देशमुख उपसंचालक कृषी विभाग मोरे अकलूज उपविभागीय अधिकारी नामदेव टीळेकर, कार्यकारी अभियंता हबू, तहसीलदार सुरेश शेजुळ उपविभागीय अभियंता पाठक वेळापूरचे सरपंच रजनीश बनसोडे गटविकास अधिकारी विनायक गुळवे नायब तहसीलदार अमोल कदम, ताते, वेळापूरचे मंडल अधिकारी संदीप चव्हाण उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नॉन क्रिमिलियर, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे दाखले, सातबारा व फेरफार उतारे लाभार्थींना प्रदान करण्यात आले. तसेच आधार तक्रार निवारण, शालेय विद्यार्थ्यांचे आधार अपडेटेशन, नवीन मतदार नोंदणी आदी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली.उपजिल्हाधिकारी चारुशीला देशमुख यांनी मनरेगाची माहिती सांगितली प्रांताधिकारी नामदेव टिळेकर यांनी महसूल सप्ताहात दस्तऐवज अद्यावत करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमासाठी वेळापूरचे ग्रामविकास अधिकारी कैलास सुरवसे, तलाठी राघवेंद्र तोरके, पिलीव, वेळापूर मंडल मधील सर्व तलाठी,कर्मचारी ई – महा सेवा केंद्राचे संचालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांनी मानले. सूत्रसंचालन शिक्षक लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी केले.येथील इंद्रनील कार्यालयात संपन्न महसूल सप्ताह उपक्रमांतर्गत जनसंवाद उपक्रमात सहभागी अधिकारी आणि मान्यवर.पत्रकार सहित उपस्थित होते

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या