Saturday, March 28, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्या५ वर्षीय बालिकेचे अपहरण करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ; मुलगी सुखरूप परत.

५ वर्षीय बालिकेचे अपहरण करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ; मुलगी सुखरूप परत.

भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ शहरात एका पाच वर्षीय बालिकेचे अपहरण करून खळबळ उडवणाऱ्या घटनेचा तपास अवघ्या काही तासांत उकलण्यात भुसावळ पोलिसांना यश आले आहे. गुन्हा तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे बालिका सुखरूप सापडली असून अपहरण करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात आला आहे.

भुसावळ शहरातील बसस्टँड रोडवरील क्षेत्र प्रशिक्षण केंद्र (ATC) समोर सार्वजनीक जागेवर फिर्यादी काजल मुन्ना ठाकुर (वय 29, रा. भाखा, अमरपूर, ता. थाना, जि. दिंडोरी, म.प्र.) यांच्या पाच वर्षीय मुलीचे 22 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने अपहरण केले. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये 23 ऑक्टोबर 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.तपासादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मिळालेल्या बातमीची खात्री केली असता, या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचे नाव गोरेलाल भगवानसिंग कछवे उर्फ भिलाला (रा. अजदरा) असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत उजनी देवस्थान, ता. बोदवड येथून आरोपीला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून अपहृत बालिकेला सुखरूप शोधून काढण्यात आले. पोलिसांनी ती बालिका फिर्यादी आईच्या ताब्यात सुरक्षितपणे सुपूर्द केली. आरोपी गोरेलाल याच्यावर यापूर्वी देखील चैनपूर पोलीस स्टेशन, जि. खरगोन (म.प्र.) येथे दिनांक 3 मे 2022 रोजी गुन्हा दाखल असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. ही संपूर्ण कारवाई जळगाव मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ संदीप गावीत, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकात सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पो.उ.नि. मंगेश जाधव, पो.हे.का. विजय नेरकर, कांतीलाल केदारे, रवींद्र भावसार, योगेश माळी, प्रशांत सोनार, भूषण चौधरी, अमर अढाळे, जावेद शहा, हर्षल महाजन, जिवन कापडे, योगेश महाजन, सचिन चौधरी, महेंद्रसिंग पाटील, मोहसिन शेख, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उ.नि. रविंद्र नरवाडे, पो.हे.का. उमाकांत पाटील, अक्रम शेख, गोपाल गव्हाळे, पो.ना. विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, राहुल रगडे, उदय कापडणे, रविंद्र चौधरी, किशोर पाटील, नेत्रम कॅमेरा विभागाचे पो.शि. मुबारक देशमुख, पंकज राठोड, प्रणय पवार यांनी अथक परिश्रम घेतले. वरिष्ठांच्या सूचनांनुसार पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ व पो.हे.का. रमण सुरळकर हे करीत आहेत.

या कारवाईमुळे पोलिसांच्या दक्षतेने आणि तात्काळ प्रतिसादामुळे एक बालिका सुखरूप आईच्या कुशीत परतली आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या