Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगाव७ महिन्यांपासून फरार रोड रॉबरी आरोपी अखेर जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची...

७ महिन्यांपासून फरार रोड रॉबरी आरोपी अखेर जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- धरणगाव येथे घडलेल्या रोड रॉबरी प्रकरणातील तब्बल सात महिन्यांपासून फरार असलेला आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखा जळगावच्या पथकाने अटक करून जेरबंद केला आहे. अभिजीत भरतसिंग राजपूत (वय २७, रा. मळाणे, ता. वणी, जि. धुळे) असे अटकेत आलेल्या आरोपीचे नाव आहे.

धरणगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक १६ डिसेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, जळगावकडून पोहवा संदीप पाटील आणि पोहवा प्रवीण मांडोळे करत होते. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यात चार आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला होता.

या गुन्ह्यातील अक्षय उर्फ घोडा भीमराव पाटील (वय २१, रा. तामसवाडी, ता. पारोळा, जि. जळगाव) याला ५ फेब्रुवारी २०२५ रोजी अटक करण्यात आली होती. मात्र, इतर तिघेजण – अभिजीत राजपूत, अजय थोरात (रा. नवलनगर, धुळे) व संभाजी पाटील (रा. सातरणे, धुळे) हे पोलीसांच्या नजरेपासून सातत्याने लपत होते. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होते. या पथकात पोउनि शरद बागल, संदीप पाटील, हरीलाल पाटील, प्रवीण मांडोळे, राहुल कोळी, दर्शना पाटील, महेश सोमवंशी यांचा समावेश होता.

दिनांक २६ जुलै २०२५ रोजी आरोपी अभिजीत राजपूत मूळगावी परतल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. अटकेनंतर चौकशीत त्याने अमळनेर पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्ह्यातही सहभाग असल्याची कबुली दिली. त्यानुसार आरोपीस अमळनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव), अशोक नखाते (जळगाव), अमळनेर विभागीय अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.इतर दोन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या