सिल्लोड | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- हॉलिफेथ इंग्लिश स्कूल भराडी ता.सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये श्री सरस्वती भुवन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, भराडी च्या 19 वर्ष खालील मुलीच्या संघाने कप्तान प्रिती उसारे च्या नेतृत्वाखाली खो-खो स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
तसेच 14 वर्षे वयोगटाखालील मुलीच्या संघाने कप्तान कल्याणी चाथे च्या नेतृत्वाखाली खो-खो स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला दोन्ही संघाला क्रीडा शिक्षक मच्छिंद्र मखरे सरांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे, उप मुख्याध्यापक सुनील माहालपुरे, प्रभारी पर्वेक्षक भाऊसाहेब बोरसे तसेच सर्व शिक्षकांनी यशस्वी मुलांचे अभिनंदन केले.