एकुण १.६६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त ; महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद
कासोदा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- कासोदा पोलीस स्टेशन हद्दीतील कासोदा गावाजवळील बांभोरी शिवारात गालापुर रोडवर फैजल शेख यांचे शेत जुगार अड्डा मांडून बसले होते. गोपनिय माहितीच्या आधारे पोलिसांनी ११ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी सुमारे ४.३० वाजता धडक कारवाई करत सात जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, गुप्त माहितीच्या आधारे बांभोरी शिवारातील गालापुर रोडजवळ वाहन उभे करून काही जुगारी फैजल शेख यांच्या शेताजवळील नाल्याकाठी जमिनीवर बसून पत्त्याचा जुगार खेळत होते. पोलिसांनी छापा टाकून त्यांना मुद्देमालासह अटक केली आहे.
या कारवाईत शेख फारुख शेख नबी (वय ५०), शेख शहीद शेख रफिक (वय ४०), शेख निजाम शेख सिराज (वय ५२), तस्लीम सुलेमान खान (वय ५७), शेख हमीद शेख शौकत (वय ४३), शेख हमीद शेख अमीर (वय ४०), शेख मुस्ताक खान अमीर खान (वय ६०) सर्व आरोपी रा. कासोदा, ता. एरंडोल, जि. जळगाव यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींच्या अंगझडतीतून व घोळक्यातून एकूण ₹३३८०/- रोख, ₹२२,०००/- किमतीचे मोबाईल आणि ₹१,४०,०००/- किमतीच्या तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹१,६६,०३०/- इतकी आहे. सदर प्रकरणी पोका १७१८ समाधान तोंडे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर तपास पथकाचे नेतृत्व सपोनि निलेश राजपुत यांनी केले, तर पो.ना.अकिल मुजावर, पो.कॉ.समाधान तोंडे, पो.कॉ. प्रशांत पगारे, पो.कॉ. कुणाल देवरे आणि पो.कॉ. योगेश पाटील या पोलिस पथकासोबत मिळून कारवाई करण्यात आली.
ही कारवाई मा. पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार, मा. अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनांनुसार पार पडली.