Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeआरोग्यनशिराबाद मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर ; विशेष औषधोपचार सुविधा

नशिराबाद मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर ; विशेष औषधोपचार सुविधा

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत भव्य निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिराचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र, नशिराबाद व गोदावरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून, राज्यस्तरीय “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” अंतर्गत आरोग्य सेवांचा प्रसार करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.

उपलब्ध आरोग्य सेवा व सुविधा:- रक्तक्षय तपासणी, असंसर्गजन्य आजार तपासणी व औषधोपचार, क्षयरोग तपासणी, कॅन्सर तपासणी, डेंग्यू व मलेरिया तपासणी, मोतीबिंदू तपासणी, लसीकरण सेवा, रक्तदान शिबिर, आयुष्यमान गोल्डन कार्ड काढणे, स्त्रीरोग, बालरोग, नेत्रचिकित्सा, कान-नाक-घसा, त्वचारोग व मानसोपचार यांचा तपासणी व उपचार सेवा, औषधी व शस्त्रक्रिया सुविधा.

स्थळ:- प्राथमिक आरोग्य केंद्र, नशिराबाद, जिल्हा जळगाव.

वेळ-:१७ सप्टेंबर २०२५, सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत.

विशेष ठसा उमटविणारी बाब म्हणजे या शिबिराच्या कार्यक्रमाला सन्माननीय खासदार स्मिता ताई वाघ उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाचे महत्व अधिकच वाढणार आहे.

नागरिकांना आवाहन:

प्राथमिक आरोग्य केंद्र, नशिराबादच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, हे संधी वाया जाऊ न देता आपल्या आरोग्याची योग्य तपासणी करून घेऊन मोफत उपचारांचा लाभ घ्यावा. विशेषतः महिलांनी, बालकांनी व वृद्धांनी या शिबिराचा लाभ घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या