नशिराबाद येथील पारितोषिक विजेते तीन गणेश मंडळ ; प्रथम पारितोषिक हनुमान गणेश मंडळ, द्वितीय पारितोषिक श्रीराम गणेश मंडळ, तर तृतीय पारितोषिक विजय मित्र मंडळाला.
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगरपरिषदेच्या वतीने आयोजित सेवा पंधरवाडा २०२५ कार्यक्रमांतर्गत गणेश मंडळांना पारितोषिक वितरण सोहळा दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी लेवा पाटील हॉल, सुनसगाव रोड, नशिराबाद येथे भव्य पद्धतीने पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीमती.स्मिताताई वाघ उपस्थित होत्या. नगरपरिषदेकडून विविध गणेश मंडळांना त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार व प्रशासक नशिराबाद श्रीमती शीतल राजपूत, BDO श्रीमती पालवे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. यासह उपाध्यक्ष जिल्हापरिषद लालचंद पाटील, माजी उपसरपंच किर्तीकांत चोबे, मनसे जिल्हा अध्यक्ष मुकुदा रोटे, भाजपा शहराध्यक्ष प्रदीप बोढरे, न्यू इंग्लिश स्कूल नशिराबाद कार्याध्यक्ष योगेश पाटील, समाजसेवक संदीप पाटील, भूषण कोल्हे, सचिन महाजन, प्रकाश महाजन, अरुण भोई, चंदू पाटील उपस्थित होते.
सार्वजनिक गणेशोत्सव 2025 अंतर्गत नशिराबाद शहरातील उत्कृष्ट मिरवणूक व सजावट यासाठी नशिराबाद नगरपरिषद तर्फे गणेश मंडळांचा गौरव करण्यात आला. त्यात तालबद्ध पद्धतीने, नियमांचे काटेकोरपणे पालन करून, भक्तांचे तसेच परीक्षकांचे मन जिंकण्यात तीन मंडळांना यशं आले. त्यांना सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत नगरपरिषदेंतर्फे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
नशिराबाद येथील पारितोषिक विजेते तीन गणेश मंडळ
यावेळी प्रथम पारितोषिक हनुमान गणेश नशिराबाद मंडळाला रु.१०,०००/- आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली. द्वितीय पारितोषिक श्रीराम गणेश मांडलेला रु.७,०००/- व ट्रॉफी मिळाली, तर तृतीय पारितोषिक विजय गणेश मंडळ नशिराबादला रू.५,०००/- व ट्रॉफी प्रदान करण्यात आली. या सन्मान सोहळ्यामध्ये संबंधित मंडळांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विशेष लक्ष वेधून घेणाऱ्या तृतीय पारितोषिक विजेत्या विजय मित्र मंडळाचा गौरवनीय इतिहास.
नशिराबाद येथील विजय मित्र मंडळ हे गेल्या दोन वर्षांपासून सलग पोलिस स्टेशनच्या वतीने पारितोषिक मिळविणारे एकमेव गणेश मंडळ आहे. याची स्थापना १९७० साली झाली असून, सध्या या मंडळात १०० पेक्षा अधिक सदस्यांचा समावेश आहे. उत्कृष्ट लेझिम पथक आणि शिस्तप्रियतेसाठी ओळखले जाणारे हे मंडळ असून, गावातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमी सक्रीय असते. या वर्षीही विजय मित्र मंडळ उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय पारितोषिकाने सन्मानित झाले आहे. यासाठी त्यांना लालचंद प्रभाकर पाटील मा.जि.प.उपाध्यक्ष जळगाव व योगेश नारायण पाटील (पिंटू शेठ) कार्याध्यक्ष नशिराबाद शिक्षण मंडळ यांचे अनमोल सहकार्य लाभले.विजय मित्र मंडळाचे पदाधिकारी:
अध्यक्ष : दर्शन जोशी, उपाध्यक्ष : किरण बऱ्हाटे, सचिव : प्रितम चौधरी, खजिनदार : प्रथमेश पाटील, सभासद : प्रशिल रोटे, मयुर बोंडे, अमोल खाचणे, गिरीष पाटील, दर्शन कुलकर्णी, पियूष जोशी, मयुर कुलकर्णी, प्रशांत पाटील, सचिन बऱ्हाटे, उदय पाटील, रोहित बऱ्हाटे, चेतन रोटे, निखिल चौधरी, तुषार रोटे, गिरीश रोटे, विशाल रोटे, गोवर्धन पाटील, उमेश कोल्हे, नंदलाल कोल्हे.
नशिराबाद नगरपरिषदेच्या वतीने नवनवीन उपक्रमांचे आयोजन.
समाजातील ऐक्य, सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा दृष्टीने समाजकल्याणाच्या दिशेने पुढील काळातही असेच नवनवीन सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.