नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार नशिराबाद नगरपरिषदेच्या वतीने सेवा पंधरवडा निमित्ताने दि. १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विविध योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ वितरणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी उद्घाटन समारंभाला मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लोकसभेची खासदार सौ. स्मिताताई वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार व प्रशासक नशिराबाद श्रीमती शीतल राजपूत, BDO श्रीमती पालवे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. तर लोक प्रतिनिधींमध्ये जिल्हापरिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी उपसरपंच किर्तीर्कांत चोबे, मनसे जिल्हा अध्यक्ष मुकुदा रोटे, भाजपा शहराध्यक्ष प्रदीप बोढरे, न्यू इंग्लिश स्कूल नशिराबाद कार्याध्यक्ष योगेश पाटील, समाजसेवक संदीप पाटील, भूषण कोल्हे, सचिन महाजन, प्रकाश महाजन, अरुण भोई, चंदू पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाला उपस्थित अधिकारी व कर्मचारी गण :-
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये दौलत गुट्टे लेखापाल, आझाद पटेल प्रशासकीय अधिकारी, अतुल चौधरी पाणीपुरवठा अभियंता, सचिन पल्हाडे संगणक अभियंता, विजय तोष्णिवाल बांधकाम अभियंता, मनोज गोरे लेखापरीक्षक, गायत्री पाटील साहाय्यक नगर रचनाकार, गीतांजली राऊत आस्थापना प्रमुख, संतोष रगडे, समीर पिंजारी, इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमअंतर्गत विविध योजना लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले:-
> पंतप्रधान आवास योजना शहरी – पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण.
> दिव्यांग लाभार्थ्यांना – ५% निधी अंतर्गत धनादेश वाटप.
> हर घर तिरंगा अभियान – सहभागी विजेत्यांना बक्षीस वितरण.
> गणेशोत्सव २०२५ – उत्कृष्ट मिरवणूक व सजावटीसाठी विजयी गणेश मंडळांचा गौरव.
> गणेश विसर्जन मार्ग स्वच्छता – स्वयंसेवक व कर्मचाऱ्यांचा सत्कार.
> ईद ए मिलादुन्नबी मिरवणूक समितीचा सत्कार – शिस्तबद्ध आयोजनाबद्दल विशेष गौरव.
प्रमाणपत्रे, साहित्य व चाव्यांचे वितरण:
संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभार्थ्यांना आदेश व प्रमाणपत्र वाटप.
जिवंत सातबारा, जात व उत्पन्न दाखले, शैक्षणिक काल प्रमाणपत्रांचे वितरण.
जळगाव पंचायत समितीमार्फत घरकुल लाभार्थ्यांना चावी वितरण.
नगरपरिषद सफाई कर्मचारी यांना गणवेश व सुरक्षा साहित्याचे वितरण.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नशिराबाद नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी सक्रिय सहभागी झाले. प्रशासन व सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभार्थ्यांपर्यंत योजना परिणामकारकपणे पोहोचविण्यासाठी महत्त्वाचे ठरले.