Tuesday, October 21, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर...भुसावळ - महिला प्रवर्ग आरक्षित तर नशिराबाद ओबीसी पुरुष...

नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर…भुसावळ – महिला प्रवर्ग आरक्षित तर नशिराबाद ओबीसी पुरुष प्रवर्गाकडे..!

भुसावळ – महिला प्रवर्ग आरक्षित तर नशिराबाद ओबीसी पुरुष प्रवर्गाकडे..

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. आज दि.६ ऑक्टोबर सोमवार रोजी राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची (Nagarpalika and Nagarparishad Reservation) घोषणा करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला जानेवारी महिना संपण्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने वेगाने तयारी सुरू केली आहे.

नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर
६ ऑक्टोबर सोमवार रोजी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. आपल्या शहराचे नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाकडे जाईल, याची लोकप्रतिनिधींमध्ये प्रचंड उत्सुकता होती. राज्यातील 67 नगर परिषदांच्या अध्यक्षपद ओबीसींसाठी जाहीर झाले आहे 67 नगरपरिषदपैकी 34 ओबीसी महिलासाठी आरक्षित करण्यात आले आहे.

नशिराबाद ओबीसी पुरुष प्रवर्गाकडे..
नशिराबाद नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना नवदुर्गोत्सवात वेग आल्याचे दिसून आले आहे. आज नुकतेच नशिराबाद नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी पुरुष प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले असून शहरातील राजकीय समीकरणे नव्याने मांडली जाणार हे मात्र निश्चित.

नगराध्यक्षपदासाठी ओबीसी पुरुष प्रवर्ग आरक्षित झाल्यानंतर अनेक जणांचा हिरमोड झाला असून बाकी इच्छुकांना मात्र आनंद झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपासून इच्छुक उमेदवारांनी नशिराबाद शहरात निवडणुकीची तयारी सुरू केली असून, सोशल मीडियावर शुभेच्छा संदेश, पोस्टर, बॅनर आणि प्रचाराचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शुभेच्छांचा आणि पाठिंब्याच्या संदेशांचा अक्षरशः पाऊस पडत आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), मनसे आणि AIMIM या पक्षांच्या गटांत कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. प्रत्येक गटाने आपल्या संभाव्य उमेदवारांसाठी गुप्त रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, AIMIM पक्षाच्या शहरातील कार्यकर्त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून संघटनवाढ आणि तरुण कार्यकर्त्यांना पुढे आणण्यावर भर दिला असून, या पक्षाकडून काही नवे चेहरे मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या शहरात निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला आहे. सोशल मीडियावरच्या पोस्ट, शुभेच्छा संदेश आणि विविध बॅनर पाहता नागरिकांमध्येही चर्चा रंगू लागली आहे — “यंदा कोणाचा डंका वाजणार?” याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात आता नगराध्यक्ष हा ओबीसी प्रवर्गातून असल्याने अनेक समीकरणे बदलल्याचे दिसून येत आहे. त्यात प्रत्येक पक्षांना आता नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी चेहरे शोधावे लागणार आहेत.

ओबीसीसाठी आरक्षित झालेल्या नगरपरिषदा
तिरोडा, वाशिम, धामणगाव, भोकरदन, भद्रावती, परांडा, भगूर, मालवण, नंदुरबार, खापा, वरोरा, हिंगोली, मोर्शी, शहादा, उमरेड, नवापूर, त्र्यंबक, कोपरगाव, हिवरखेड, बाळापूर, शिरूर, कुळगाव ( बदलापूर ), मंगळूरपीर, कन्हान पिंपरी, पाथर्डी, देगलूर, नेर नबाबपूर, धाराशिव, इगतपुरी, रामटेक, माजलगाव, नाशिराबाद, पालघर, मूल, वरणगाव, बल्हारपूर, मलकापूर (बुलढाणा), इस्लामपूर, जुन्नर, कुरडुवाडी, मोहपा, तुमसर, औसा, महाड, मुरुड जंजिरा, अकोट, चोपडा, सटणा, काटोल, गोंदिया सांगोला, दौंड, राहता, श्रीवर्धन, रोहा, ब्रम्हपुरी, देसाईगंज, येवला, कुलगाव, कर्जत, दौंडाईचा वरवडे, कंधार, शिरपूर वरवडे.

ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी कोणत्या नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण?
भगूर – ओबीसी महिला, इगतपुरी – ओबीसी महिला, विटा – ओबीसी महिला, बल्हारपूर – ओबीसी महिला, धाराशिव – ओबीसी महिला, भोकरदन – ओबीसी महिला, जुन्नर – ओबीसी महिला, उमरेड – ओबीसी महिला, दौडं – ओबीसी महिला, कुळगाव बदलापूर – ओबीसी महिला, हिंगोली – ओबीसी महिला, फुलगाव – ओबीसी महिला, मुरुड जंजीरा – ओबीसी महिला, शिरूर – ओबीसी महिला काटोल – ओबीसी महिला, माजलगाव – ओबीसी महिला, मूल – ओबीसी महिला, मालवण – ओबीसी महिला, देसाईगंज – ओबीसी महिला, हिवरखेड – ओबीसी महिला, अकोट – ओबीसी महिला, मोर्शी – ओबीसी महिला, नेर- नवाबपूर – ओबीसी महिला, औसा – ओबीसी महिला, कर्जत – ओबीसी महिला, देगलूर – ओबीसी महिला, चोपडा – ओबीसी महिला, सटाणा- ओबीसी महिला, दोंडाईचा वरवडे – ओबीसी महिला, बाळापूर – ओबीसी महिला, रोहा – ओबीसी महिला, कुरडुवादी – ओबीसी महिला, धामणगावरेल्वे – ओबीसी महिला, वरोरा – ओबीसी महिला.

एकूण 33 नगरपरिषदांपैकी 17 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये मोहोळ, ओझर, भुसावळ, शिर्डी, दिग्रस, अकलूज, बीड नगरपरिषदांचा समावेश आहे.

33 नगरपरिषदापैकी 17 नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर-

देऊळगावराजा – महिला प्रवर्ग आरक्षित, मोहोळ – महिला प्रवर्ग आरक्षित, तेल्हारा – महिला प्रवर्ग आरक्षित, ओझर – महिला प्रवर्ग आरक्षित, वानाडोंगरी – महिला प्रवर्ग आरक्षित, भुसावळ – महिला प्रवर्ग आरक्षित, घुग्गूस – महिला प्रवर्ग आरक्षित, चिमूर – महिला प्रवर्ग आरक्षित, शिर्डी – महिला प्रवर्ग आरक्षित, सावदा- महिला प्रवर्ग आरक्षित मैनदर्गी – महिला प्रवर्ग आरक्षित दिगडोहदेवी – महिला प्रवर्ग आरक्षित, दिग्रस- महिला प्रवर्ग आरक्षित, अकलूज – महिला प्रवर्ग आरक्षित, बीड – महिला प्रवर्ग आरक्षित, शिरोळ – महिला प्रवर्ग आरक्षित.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या