नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद पेठ भागातील स्मशान-भूमी परिसरात असलेल्या नशिराबाद शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी भोवती मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाला आहे. परिसरात साचलेली घाण, दुर्गंधी व दूषित वातावरणामुळे तसेच विहिरीच्या कठड्यावर उघड्यावर संडासला लोक बसत असल्याने पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता धोक्यात आली आहे. विहिरीच्या 15 फूट अंतरावर असलेल्या सार्वजनिक संडासचा फुटलेला मैल्याचा पाईप मधून मैला उघड्यावर वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिणामी या दुर्गंधी मुळे टायफॉईड, अतिसार, कालरा यांसारख्या आजारांचा प्रसार होण्याची शक्यता वाढली आहे.
टवाळखोरांनी उघड्यावर संडास केल्यामुळे विहिरीच्या आजूबाजूला पडलाय संडासचा सळा/मैला..
प्राथमिक आरोग्य केंद्र, नशिराबाद यांच्याकडून नगरपरिषदेला लेखी पत्राद्वारे तात्काळ उपाययोजना करण्याचा इशारा
या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र, नशिराबाद यांनी नगरपरिषदेला लेखी पत्राद्वारे तात्काळ उपाययोजना करण्याचा इशारा दिला आहे. पाणी पुरवठा विहिरीचा परिसर स्वच्छ करून आवश्यक प्रतिबंधात्मक पावले उचलावीत तसेच गरज भासल्यास विहिरीचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवावा, अशा स्पष्ट सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
विहिरीच्या 5 ते 7 फूट अंतरावरील फुटलेला संडासचा मैल्याचा पाईप
विहिरीभोवती निर्माण झालेल्या अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. लवकरात लवकर स्वच्छता मोहीम हाती घेऊन नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. नगरपरिषदेने या प्रकरणात तत्परतेने पावले उचलून आरोग्याचा धोका टाळावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
शासनाने लाखो रुपये खर्च करून केलेली स्मशानभूमीच मृतावस्थेत.. ती सुरू करण्याची स्थानिकांची मागणी.
अद्याप सुरूच न झालेल्या स्मशान भूमीच्या सीटवर सुद्धा संडास केल्याचा निंदनीय प्रकार समोर…