Wednesday, February 11, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यातळोदा येथे ग्राहक पंचायत नाशिक विभागाचा अभ्यास वर्ग संपन्न ; १४ साधकांना...

तळोदा येथे ग्राहक पंचायत नाशिक विभागाचा अभ्यास वर्ग संपन्न ; १४ साधकांना जीवन गौरव व उत्कृष्ट साधक पुरस्कार

तळोदा (जि. नंदुरबार) | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथे चिरायू हॉलमध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र नाशिक विभागामार्फत आयोजित करण्यात आलेला विभागीय अभ्यास वर्ग नुकताच पार पडला. या अभ्यास वर्गात नाशिक विभागातील एकूण १४ साधकांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यात ५ जणांना जीवन गौरव तर ९ जणांना उत्कृष्ट साधक पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्राहक पंचायत महाराष्ट्र, जळगाव जिल्हा अध्यक्ष मा. गुरुबक्ष किशनचंद जाधवानी यांनी भूषविले.

पुरस्कार प्राप्त जळगाव जिल्ह्यातील मान्यवर साधकांची यादी पुढीलप्रमाणे.
जीवन गौरव पुरस्कार संजय बाळकृष्ण शुक्ल, भुसावळ, मनोज नवनीतलाल जैन, पारोळा, प्रा. सौ. उज्वलाताई मुकुंद देशपांडे, एरंडोल, सतिषज मुरलीधर गडे, यावल, डॉ. अविनाश सदाशिव सोनगीरकर, जळगाव सिटी, उत्कृष्ट साधक पुरस्कार
राजेंद्र गुलाब शिंपी, पाचोरा, शांताराम सुखदेव चौधरी सर, पाचोरा, उदय शरदचंद्र अग्निहोत्री, चोपडा, सौ. सुषमा सुभाष चव्हाण, जामनेर, डॉ. नितीन अरुण धांडे, जळगाव सिटी, शरद अरुण सोनवणे, जळगाव, रश्मी प्रसाद दंडवते, ता. एरंडोल, जि. जळगाव, राजेश पंडित खैरनार, ता. चोपडा, जि. जळगाव, प्रल्हाद बळीराम सोनवणे, ता. जामनेर, जि. जळगाव असे असून कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यातील तसेच नाशिक, नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर आदी जिल्ह्यांतील साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, पारोळा, पाचोरा, भुसावळ, यावल, जामनेर, पहूर, चोपडा आणि जळगाव शहरातील साधकांचा विशेष सहभाग होता.

उपस्थित मान्यवरांमध्ये जळगाव जिल्हाध्यक्ष गुरुबक्ष जाधवानी, हितेंद्र महाजन, प्रमोद सोनार, वंदना हेमंत कुलकर्णी, रवींद्र पाटील, प्रसाद दंडवते, जयश्री खैरनार, लता खैरनार,बंडू भांडारकर, सुबोध पाटील, श्री सुभाष चौधरी,अतुल बाविस्कर यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तळोदा ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजय शर्मा यांनी केले, तर नाशिक विभागाध्यक्ष डॉ. अजय सोनवणे यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या