मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह.
सोलापूर/जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील/ पोलीस दक्षता लाईव्ह:-वळसंग पोलीसांच्या रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान एन.टी.पी.सी.समोरील रोडवर आरोपी म्हाळप्पा पुजारी याने त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीची टेम्पो मधून व्हनमुर्गी येथील सिना नदीच्या पात्रातील 2 ब्रास वाळु शासनाची परवानगी न घेता,कर न भरता पर्यावरणाला धोका होईल हे माहिती असतानादेखील वाळू चोरून घेवून जाताना मिळून आला.सदर वाहन चालकाविरूध्द वळसंग पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदरच्या कारवाईमध्ये एकुण 10 लाख 12 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव,अक्कलकोट विभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलीस ठाण्याचे सपोनि अनिल सनगल्ले यांच्या पथकातील पोलीस हवालदार रमेश माने,पोलीस नाईक अबुताहेर शेख,पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गायकवाड,दिपक गाढवे यांनी केली आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक रामदास मालचे हे करीत असून गुन्ह्यातील वाहनाचे चालक व मालक यांना अटक करण्यात आलेली आहे.