Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याघटस्फोट हा चिंतेचा विषय; पुणे येथील सोनार समाजाच्या सहविचार सभेत मान्यवरांचा सूर

घटस्फोट हा चिंतेचा विषय; पुणे येथील सोनार समाजाच्या सहविचार सभेत मान्यवरांचा सूर

घटस्फोट हा चिंतेचा विषय; पुणे येथील सोनार समाजाच्या सहविचार सभेत मान्यवरांचा सूर

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

पुणे/कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- जन्मबंध फाउंडेशन आयोजित विवाह संस्था व घटस्फोट तंटा निवारण शिखर समितीतर्फे सोनार समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांची सहविचार सभा पुणे येथे संपन्न झाली. यात विविध राज्यातील पदाधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते..हा कार्यक्रम पुणे शहरातील प्राधिकरण ,निगडी येथील डॉ.हेगडेवार भवन समोरील विश्वकर्मा भवनात झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज चिंतामणी व जन्मबंध फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकरजी मोरे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून न्यायमूर्ती सुनील वेदपाठक ,शिवानंद टाकसाळे ( आय.ए. एस ),पोलीस महासंचालक राजेंद्र डहाळे ,जलप्राधिकरण विभागाचे सेवानिवृत्त मुख्य सचिव नंदकुमार वडनेरे ,सेवानिवृत्त आयकर निरीक्षक आणि साहित्यिक ब.ल.पोतदार ,कराड अर्बन बँकेचे संचालक तथा उद्योजक आनंदराव पालकर ,शिखर समितीचे अध्यक्ष राजन दीक्षित ( सोलापूर ) यांच्यासह अनंतराव उंबरकर ( विदर्भ ) ,उद्योजक व अखिल माळवी महासंघाचे अध्यक्ष विलास अनासने,ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे मोहन शेट हिवरकर ,नंदकुमार गुंबळे, संजय बागुल ,शशिकांत विसपुते ,जीवन जगदाळे,देवेंद्र घोडन दिकर ,सचिन टकले, सौ.पूजा शहाणे,भगवान वानखेडे आदी उपस्थित होते.
सहविचार सभेत समाजाच्या विविध गंभीर प्रश्न ,समस्या आणि महिलांवर होणारे अत्याचार, सुरक्षतेबद्दल प्रकाशझोत टाकण्यात येऊन सांगोपांग चर्चा झाली..
न्यायमूर्ती श्री.वेदपाठक म्हणाले ,समाजात घटस्फोटाचे प्रमाण हा चिंताजनक विषय झाला आहे.
पती-पत्‍नी झाल्यानंतर स्वप्नात जगण्यापेक्षा वास्तवाचे भान ठेवून आपल्या संसाराचं सारथ्य केलं तर कुठलेही विवाह अपयशी ठरणार नाही ,असे त्यांनी सांगितले.. तर शिवानंद टाकसाळे (आय.ए.एस.) म्हणाले , विवाहापूर्वी एकमेकांची खरी ओळख पटवून घेणं म्हणूनच आवश्यक असतं. आज समाजात मुलं व मुली हे उच्च शिक्षण घेत असताना केवळ त्यांची वागण्याची वृत्ती ही बदलत चालली आहे..बहुतांश तरुण चंगळवादाकडे वाहवत चालले असल्याची खंतही त्यांनी चर्चेदरम्यान व्यक्त केली.

विवाह करण्यापूर्वी परस्परांना समजून घेऊन, एकमेकांचा स्वीकार करावा म्हणजे भविष्यातील गैरसमजुती आपोआप नाहीशा होतील. म्हणूनच लग्नापुर्वीच आपल्या विषयीची सर्व माहिती मोकळेपणी जोडीदाराला सांगणे आवश्यक ठरते. म्हणून आपण कसे आहोत, आपल्या आवडी-निवडी, स्वभावा बद्दल आपल्या जोडीदाराला मोकळेपणाने सांगणे आवश्यक असते “,असे विचार सेवानिवृत्त आयकर निरीक्षक आणि साहित्यिक ब.ल.पोतदार यांनी मांडले आणि यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची स्वतंत्र फळी निर्माण करून ऐक्याची गरज असल्याचेही प्रतिपादन केले.
समाजसेवक व जन्मबंध फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकरजी मोरे यांनी सांगितले की , ” समाजात जटील प्रश्न निर्माण होत आहेत ,याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा.
महत्वाची गोष्ट म्हणजे पती-पत्नीने एकमेकांवरील विश्वास संपादन केला पाहिजे.
संसार करत असताना इगो ( अहंकार ) बाळगता कामा नये ,एकमेकांकडून प्रेम मिळवणे सोपे नसते. त्यासाठी मी-पणा सोडून त्याग भावनेने राहण्याची गरज आहे .संसाराची वाटचाल करताना अपमान किंवा भावना दुखावण्याचा प्रकार घडायला नको, तेव्हा लगेच एक-दुसऱ्याला सांभाळून घेतल्यास घटस्फोटाचा विषयच येत नाही.अगदी क्षुल्लक कारणावरून चक्क घटस्फोट करणे चुकीचे असल्याचे मत सुद्धा त्यांनी व्यक्त केले.
या सामाजिक कार्यक्रमाला इंदौर येथील देवी अहिल्या मंडळाच्या अध्यक्षा सोनाली सोनार आणि मेघा गिरीश जडे, रमा अशोक पिंगळे ,शालू ओमप्रकाश जाधव,पूजा परेश चौहान ,मेघा अभिषेक पिंगळे ,कु.खुशबू सोनार ,कु. ऐश्वर्या जडे
हे आवर्जून उपस्थित होते ,त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन कौतुक करण्यात आले. जन्म बंध फाऊंडेशन तसेच विवाह संस्था व घटस्फोट तंटा निवारण शिखर समितीतर्फे आयोजित कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक ,समाज बांधव- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या