Sunday, July 13, 2025
police dakshta logo
Homeजळगावलेखक प्रा.व.पु. होले यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन

लेखक प्रा.व.पु. होले यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

जळगाव / कार्यकारी संपादक / तुषार वाघुळदे / पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव लेवा गणबोलीचे उपासक आणि सावदा येथील प्रा.व.पु. होले यांच्या “कौतुक तू पाहे संचिताचे ” आणि ” ..तर आनंद तरंग उठणारच” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुळजी जेठा महाविद्यालयातील जुना कॉन्फरन्स हॉल मध्ये पार पडला..

छत्रपती संभाजीनगर येथील जनशक्ती वाचक चळवळचे संचालक श्रीकांत उमरीकर आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षणशास्त्र विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता डॉ.साहेबराव भूकन यांच्या शुभहस्ते झाले.
केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर अध्यक्षस्थानी होते,याप्रसंगी प्राचार्य स.ना.भारंबे ,अशोक राणे व्यासपीठावर होते..


जळगाव जिल्ह्यातील साहित्य व कला क्षेत्रातील अनेक मान्यवरांची या समारंभाला आवर्जून उपस्थिती होती.. त्यात तिसऱ्या लेवा गणबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अरविंद नारखेडे ,लेवा गणबोली साहित्य मंडळाचे सचिव सामाजिक कार्यकर्ते व कलावंत तुषार वाघुळदे ,चित्रकार लिलाधर कोल्हे ,नरेंद्र नारखेडे ,प्रा.एस.एस.झो पे,माजी शिक्षणाधिकारी नीलकंठ गायकवाड , शशिकांत हिंगोणेकर , रमेश राणे यांच्यासह अनेक रसिक- श्रोते यांची उपस्थिती होती.. लेवा गणबोली साहित्य मंडळातर्फे प्रा.होले यांना शुभेच्छा देण्यात आल्यात.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या