Thursday, July 9, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणगरीब विद्यार्थिनींना रोटरी क्लब जळगाव ईस्टकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप

गरीब विद्यार्थिनींना रोटरी क्लब जळगाव ईस्टकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप

न्यू इंग्लिश स्कूल, नशिराबाद येथे सहा विद्यार्थिनींना दत्तक योजनेअंतर्गत मदतीचा हात

नशिराबाद | प्रतिनिधी |पोलीस दक्षता लाईव्ह :- रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या सामाजिक उपक्रमांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल, नशिराबाद येथील चालू शैक्षणिक वर्षासाठी दत्तक घेतलेल्या सहा गरजू व होतकरू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य व आवश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या माध्यमातून श्री. मधुकर चौबे व श्री. सुशील असोफा यांच्या सहकार्याने विद्यार्थिनींना ही मदत करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टचे अध्यक्ष डॉ. मनोज चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना, शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने लवकरच मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली.कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या माजी अध्यक्षा पूजा अग्रवाल, सदस्य श्री. सुशील असोफा, राहुल सिंग तसेच नशिराबाद शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, सचिव मधुकर चौबे, अध्यक्ष डॉ. विकास चौधरी, संचालक जनार्दन माळी, राजेश पाटील, ॲड. प्रदीप देशपांडे आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. ए. बनसोडे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजू पाचपांडे यांनी केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या