Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेमुळेच संपूर्ण भारत संपूर्ण दृष्ट्या प्रगल्भ - डॉ.जुगल घुगे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेमुळेच संपूर्ण भारत संपूर्ण दृष्ट्या प्रगल्भ – डॉ.जुगल घुगे

मुख्य संपादक चंदन पाटील…

कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेमुळेच संपूर्ण भारत संपूर्ण दृष्ट्या प्रगल्भ – डॉ.जुगल घुगे
समाजकार्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त कार्यक्रम

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- दिनांक 14 एप्रिल  शुक्रवार रोजी धनाजी नावा चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांच्या शुभहस्ते माल्याअर्पण करण्यात आले .

तदनंतर विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर जुगल घुगे सर यांनी उपस्थित असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना ते असे म्हणाले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव असे व्यक्तिमत्व आहे की, ज्यांनी मागास असणाऱ्या सर्व वर्गांना, सर्व जाती समुदायांना सन्मान कसा मिळेल. यासाठी त्यांनी अहोरात्र कार्य केले आहे. चवदार तळ्याचा सत्याग्रह असो, नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह, अशा विविध स्वरूपाच्या सत्याग्रह आयोजन त्यांनी केले.याचा प्रभाव संपूर्ण भारतीय समाजावर होऊन गेला. त्यामुळे आज आपण सर्व सर्व भारतीय बांधव संविधानाच्या स्वरूपामध्ये एकत्र असे बांधले गेले आहोत . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधारेमुळेच आज संपूर्ण भारत देश सर्वांगीण दृष्ट्या प्रगल्भ झालेला आहे . त्यांनी सामाजिक आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, सर्वच क्षेत्रांमध्ये आपले योगदान दिले . त्यांनी प्रतिपादन केले .

त्यानंतर विजय गायकवाड यांनी उपस्थित असलेल्या सर्वांना त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून दिले. या कार्यक्रमाप्रसंगी समाजकार्य महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्राध्यापक जुगल घुगे सर यांनी सूत्रसंचालन केले. उपस्थित कर्मचाऱ्यांना त्रिशरण पंचशील ग्रहण करताना डावीकडून डॉ. अशोक हनवते, डॉ. भारती गायकवाड, विजय गायकवाड , डॉ. निलेश चौधरी, डॉ. राकेश चौधरी, डॉ.जुगल घुगे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या