Sunday, November 15, 2026
police dakshta logo
Homeक्राईमजळगाव जिल्ह्यात वाहतूक नियमभंगाविरोधात पोलिसांची विशेष मोहीम; ५२६ वाहनचालकांवर कारवाई, २ लाख...

जळगाव जिल्ह्यात वाहतूक नियमभंगाविरोधात पोलिसांची विशेष मोहीम; ५२६ वाहनचालकांवर कारवाई, २ लाख १३ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जिल्ह्यातील रस्ते अपघातांना आळा घालण्यासह वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ५२६ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून २ लाख १३ हजार ८५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ३० इसमांविरुद्ध कायदेशीर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील विविध ठिकाणी वाहनांची तपासणी करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

विशेष मोहिमेतील कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे : ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणी ४९ केसेस, मोटार वाहन कायद्यानुसार इतर नियमभंगाच्या ३५६ केसेस, फॅन्सी नंबर प्लेटच्या १५ केसेस, कलम १९४ बी अंतर्गत ३१ केसेस, तीन सीट प्रवास करणाऱ्या ४ केसेस, विना परवाना वाहन चालविण्याची १ केस, कलम ६६/१९२ अंतर्गत ८ केसेस, तर हेल्मेट न वापरणाऱ्या ६२ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. अशा एकूण ५२६ केसेस दाखल करण्यात आल्या.मद्यप्राशन करून वाहन चालविणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे हे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवितास धोकादायक ठरू शकते. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा तसेच सार्वजनिक ठिकाणी उडवाउडवी करून मद्यप्राशन करू नये, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव, तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा जळगाव व चाळीसगाव, भुसावळ येथील अधिकारी आणि अंमलदार यांच्या विशेष पथकांनी केली. या मोहिमेत सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या