Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगाव'नाबार्ड ' तर्फे आयोजित खान्देश पापड महोत्सवास ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद....!

‘नाबार्ड ‘ तर्फे आयोजित खान्देश पापड महोत्सवास ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद….!

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

जळगाव / कार्यकारी संपादक / तुषार वाघुळदे / पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्यावतीने गेल्या १४ वर्षांपासून ‘खान्देश पापड महोत्सवाचे’ आयोजन होत असतो, या महोत्सवाचे यंदाही १५ ते १७ एप्रिल दरम्यान सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत लेवा बोर्डिंग,जी.एस.ग्राऊंड समोर,जळगाव येथे आयोजन करण्यात आले.मात्र या पापड महोत्सवाला ग्राहकांचा फारसा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर दिसून आला. अखेरच्या दिवशी सहजच फेरफटका मारला असता अनेक महिला बचत गट धारकांशी संवाद साधला असता आम्ही निर्मिती केलेल्या वस्तूंची विक्री झाली नसल्याचे तर काहींनी फक्त दोन-तीन ग्राहकांनी वस्तू खरेदी केल्याचे सांगण्यात आले.

शनिवार दिनांक १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्या हस्ते पापड महोत्सवाचे उद्घाटन झाले होते. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) चे सहाय्यक महाव्यवस्थापक श्रीकांत झांबरे, बँकेचे संचालक सतीश मदाने, हरिश्चंद्र यादव, डॉ.आरती हुजुरबाजार, तसेच विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभा पाटील, माजी संचालिका सावित्री सोळुंखे, विंदा नाईक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील, उपमहाव्यवस्थापक नितिन चौधरी आदी याप्रसंगी उपस्थित होते तर आज तिसऱ्या दिवशी नाबार्डचे श्री.झाम्बरे ,नितीन चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दुपारी एक वाजेच्या सुमारास बचत गट प्रमुखास सहभाग घेतल्याबद्दल आणि उत्कृष्ठ गटास मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले..

आपण तयार केलेल्या मालास आमच्या बँकेतर्फे व नाबार्ड तर्फे मार्केट उपलब्ध करून दिले असून गुणवत्ता वाढीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले..
या पापड महोत्सवात सुमारे 30 बचत गटांचा सहभाग होता. येथे पापड, कुरडई, नागलीपापड, शेवया, हातशेवया ,उपवास पापड, मुखवासचे विविध प्रकार,नैसर्गिक प्रकारची हळद, कापड ,इ. सर्व वस्तू तसेच इतर गृहपयोगी साहित्य उपलब्ध होते. महिला बचत गटांना प्रशिक्षण देणे आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच बचत गटांच्या विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने बँकेने राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या सहकार्याने या बाजारपेठेचे आयोजन केले होते ,मात्र उन्हाचा तडाखा आणि इतर कारणामुळे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने दृश्य दिसून आले. पापड महोत्सवास नागरिकांनी अत्यल्प प्रतिसाद दिल्याने काहींचे स्टॉलचे भाडेही निघाले नसल्याचे प्रतिनिधीस बोलून दाखविले..

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या