Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगावजिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात; राष्ट्रवादीचे पोलिस प्रशासनाला निवेदन

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात; राष्ट्रवादीचे पोलिस प्रशासनाला निवेदन

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याबाबतचे निवेदन काल रोजी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना देण्यात आले .

निवेदनात म्हणण्यात आले आहे की ,जळगाव जिल्ह्यातील अनेक अवैद्य धंदे उदा. रेती, सट्टा, गुटखा, जुगार, प्रवासी वाहतूक, ऑनलाईन सट्टा , जुगार ,खून मारामाऱ्या दंगे ,वाहनात गॅस भरणे , खंडणी ,रेशनिंगचा माल ,भूमाफिया व तत्सम प्रकारात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील पोलीस व महसूल प्रशासन याला सर्वस्वी जबाबदार आहे. गल्लोगल्ली सट्टा आणि जुगार सुरू झाला असून शहरात व जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाहनात अनाधिकृतरित्या सिलेंडर मधील गॅस भरण्याकरता अनेक टपऱ्या सुरू झालेल्या दिसून येत आहे. पोलीस व महसूल विभागाच्या गैर कारभाराने सदर धंदे फोफावले आहेत . पोलीस आणि महसूल मंत्री यांच्या आशीर्वादाने पोलीस बंदोबस्तात जागा खाली करण्याकरता भू-माफिया सक्रिय झाले आहे .अशा भू-माफियांना पोलिसांच्या आशीर्वादाने ताकद मिळत आहे, रेती व गुटखा रेशनिंगचे अन्नधान्य अनधिकृत पणे विकले जात असून सदर धंदे महसूल विभागाच्या लाचखोरीने जोमात सुरू आहे.असा आरोप राष्ट्रवादी पक्षाने केला आहे.
मागील काळात जिल्ह्यातील गुन्हेगारी संपवण्यात पोलीस विभाग यशस्वी ठरले होते .परंतु शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यकाळात जिल्ह्यातील खून , दरोडे ,दंगे ,खंडणी, माऱ्यामाऱ्या ,चोऱ्या , सट्टा जुगार इत्यादी सर्व अवैध धंद्यात वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले असून राज्याच्या गृहमंत्र्यांनी या गोष्टीची दखल घेणे गरजेचे आहे. फक्त विरोधातील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे ध्येयास तिलांजली देऊन जिल्ह्यातील अवैध धंद्यात भु-माफीया, दंगेखोर ,सट्टा जुगार , वाळू , गुटखा, खुन, दरोडे ,चोऱ्या इत्यादी प्रमाणात सामील असणाऱ्या गुन्ह्यागारांना काबुत आणण्याकरता प्रयत्न करावे. अन्यथा पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल .तसेच यावर आळा न घातल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगर जळगावच्या वतीने साखळी उपोषणास बसणार आहे . निवेदन देतांना महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , माजी नगरसेवक राजू मोरे , रिकू चौधरी , किरण राजपूत उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या