Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यासंभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी,मका बाजरीचे नुकसान होणार...!

संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी,मका बाजरीचे नुकसान होणार…!

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

संभाजीनगर/कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- संभाजीनगर-औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दुपारी १२ वाजेपासून पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे.

आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. फुलंब्री, गोळेगाव,सिल्लोड ,संभाजीनगर ,पैठण, गंगाखेड ,अन्वी आदी भागात दुपारी दोन वाजेपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी रिमझिम तर, काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे.
आज सकाळी ११ वाजेपासून संभाजीनगर ( औरंगाबाद ) जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत होते. दुपारनंतर मात्र परिस्थिती आणखीनच बदलली. दरम्यान दुपारी दोन वाजेपासून जिल्ह्यातील काही भागात काही भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. तर काही ठिकाणी विजाच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होणार आहे असे एका शेतकऱ्याने सांगितले. त्यात गहू ,बाजरी ,मका आणि इतर पिकांचे या अवकाळी पावसाने नुकसान होण्याची शक्यता आहे.काही भागात वातावरण अंधारलेले दिसून येत असून काही ठिकाणी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. आज पाऊस सुरू झाल्याने अनेकांची तारांबळ उडत असल्याचे चित्र दिसून आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या