Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeक्राईमअट्टल गुन्हेगार चिंग्याने असोद्यात केला गोळीबार; कोल्हे नामक तरुण बचावला; परिसरात भीतीचे...

अट्टल गुन्हेगार चिंग्याने असोद्यात केला गोळीबार; कोल्हे नामक तरुण बचावला; परिसरात भीतीचे वातावरण…!

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

जळगाव/कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- जिल्ह्यात गोळीबाराचे सत्र सुरूच असून गुन्हेगारांनी डोके वर काढले असून पोलीस प्रशासन ढिम्म का ? असा सूर नागरिकांमध्ये आहे.दरम्यान जळगाव तालुक्यातील आसोदा गाव गोळीबाराने हादरले आहे. मध्यरात्री नंतर पहाटेच्या सुमारास जळगाव-असोदा मार्गावर हॉटेल आर्या परमिट रुम बियर बार जवळ गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

खुनातील संशयित चिंग्याने पूर्व वैमनस्यातून आसोद्यातील तरुणावर मध्यरात्रीच्या सुमारास तीन गोळ्या झाडल्याची बाब समोर आली आहे ,असे पोलीस सूत्रांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. सुदैवाने फायर मिस केल्याने तरुण बचावला आहे. हवेत गोळीबार केला गेला.या प्रकरणी संशयित चिंग्या उर्फ केतन सुरेश आळंदे (आसोदा) व कयुब उर्फ कैलास पंढारे ( शिवाजी नगर, जळगाव) यास पोलिसांनी अटक केली असून हॉटेल आर्या जवळ पोलीस बंदोबस्त दिसून आला. आज सकाळपासूनच पोलीस व्हॅन हॉटेल जवळ तैनात होती.. पोलिसांचा मोठा ताफा होता.दुपारी दीड नंतर ती व्हॅन तेथून गेल्याचे सांगण्यात आले. या घटनेत योगेश दिगंबर कोल्हे (आसोदा) हा गोळीबारातून बालंबाल बचावला आहे ,

जामिनावर येताच चिंग्याने गोळीबाराचे कृत्य केले.पोलिस दप्तरी हा कुविख्यात असून अलीकडेच खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर त्याची मुक्तता झाल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी त्याचा योगेश कोल्हे सोबत वाद झाला होता, हा वाद कोणत्या कारणावरून झाला ते समजू शकले नाही.त्याचा वचपा काढण्यासाठी त्याने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सहकारी कैलास पंढारेसोबत दुचाकीवर या हॉटेलजवळ आला आणि गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत तीन गोळ्याच्या फैरी झाडण्यात आल्या; मात्र सुदैवाने या घटनेत योगेश बचावला आहे. दरम्यान, योगेश याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल आहेत, त्याच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली, मात्र विभागीय आयुक्तांकडून या कारवाईला स्थगिती मिळाल्याची माहिती आहे.संशयितांनी मद्याच्या नशेत फायरींग करून मोठी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून पोलीस इतर माहितीचा कसोशीने शोध घेत आहे.
दरम्यान या भयावह घटनेने असोदा परिसरात भीतीमय वातावरणात पसरले आहे.संशयित आरोपी हा अत्यंत अट्टल गुन्हेगार आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी घटनास्थळी दाखल झाले होते.त्यांनी घटनास्थळ आणि हॉटेलच्या मागील भागाचीही पाहणी केली ,असे प्रत्यक्ष दर्शीने सांगितले.पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर तीन राऊंड आढळून आले आहेत. दरम्यान, दुचाकीवर आलेल्या दोन जणांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यातील एक संशयित हा अटल गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. दोघांची कसून चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे.लवकरच इतर माहितीही हाती लागेल असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. रात्रीच्या वेळी कोंबिंग ऑपरेशन राबवावे आणि वाहनधारकांची बारकाईने चौकशी करावी अशी अपेक्षा सुजाण नागरिकांनी केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या