Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्यावादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, नागपूरच्या गोंडवाना येथे भिंत कोसळल्याने माय लेकाचा दुर्दैवी...

वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, नागपूरच्या गोंडवाना येथे भिंत कोसळल्याने माय लेकाचा दुर्दैवी अंत

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह….

नागपूर/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- शहरात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. गोंडवाना परिसरातील जेपी हाईट्स नावाच्या बहमजली इमारतीची सुरक्षा भिंत शेजारच्या घरावर कोसळली. या घटनेत दोन जणांचा दबून मृत्यू ओढवला आहे.

नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये काल वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला. नागपुरात गड्डीगोदाम परिसरातील मकोसाबाग येथे असलेल्या जे. पी. हाईट्स या इमारतीची वॉल कंपाउंडवर तीन-चार झाडं कोसळली. नागपूर शहरात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. गोंडवाना परिसरातील जेपी हाईट्स नावाच्या बहमजली इमारतीची सुरक्षा भिंत शेजारच्या घरावर कोसळली. आदिवासीनगरात यादव यांचे घर आहे. अपार्टमेंटमध्ये मोठमोठी झाडं आहेत. गुरुवारी आलेल्या वादळी वाऱ्याने चार झाडे कोसळली. यामध्ये वॉल कंपाऊंडच्या बाजूला असलेल्या झोपडीवर कोसळून त्यामध्ये आई आणि मुलगा असे दोघेजण दबले. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दल आणि पोलीस जवानांनी त्या ठिकाणी पोहोचून रेस्क्यू ऑपरेशन केलं. मात्र सकाळपर्यंत त्या ठिकाणी बघीतलं तर सगळी झाड पडलेली दिसली. तसेच वॉल कंपाऊंडची भिंत झोपडीवर पडलेली पाहायला मिळाली.
यादव यांची झोपडी उद्धवस्त झाली. यात ज्योती अशोक यादव (वय ४५) आणि अमन अशोक यादव (वय १६) अशा दोघांचा मृत्यू झाला. बाहेर वादळ वार सुरू असल्याने मायलेक घरीच होते. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. सदर पोलीस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. आधी अमला बाहेर काढून मेयो रुग्णालयात पाठवले. डॉक्टरांनी अमनला मृत घोषित केले ,या दुर्दैवी घटनेने एकच शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या