Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यापंजाबराव डख यांचा नवा इशारा..! महाराष्ट्रात १० दिवस, गारपीट व वादळी वारे...

पंजाबराव डख यांचा नवा इशारा..! महाराष्ट्रात १० दिवस, गारपीट व वादळी वारे यासह मान्सूनसारखा मुसळधार पाऊस कोसळणार…!!

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

जळगाव/कार्यकारी संपादक/तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- परभणी जिल्ह्यातील सुपुत्र व राज्यातील हवामान अभ्यासक पंजाबराव डख हे तंतोतंत अंदाज वर्तविण्यात प्रसिद्ध आहेत. गेल्या काही वर्षांपासून आपल्या हवामान अंदाजासाठी पंजाबराव डख महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय झाले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचा पंजाबरावांच्या हवामान अंदाजावर दिवसेंदिवस विश्वास वाढत आहे. गारपीट कशी होते हे ज्यांनी कधी पाहिले नाही, त्यांनासुद्धा ही गारपीटपहायला मिळेल..असाही अंदाज डख यांनी वर्तविला आहे. राज्यातील सर्वानी 24 एप्रिल पासून 2 मे दहा दिवस विजा, वादळी वारे, पाऊस, गारपिट यापासून स्वःतची, पाळीव प्राणी, हळद, इतर पिकांची काळजी घ्यावी.. कारण 24 एप्रिलपासून राज्यात भाग बदलत 2 मे पर्यंत दहा दिवस पाऊस पडणार आहे,तरी अंदाज लक्षात घेऊन शेतीचे कामे करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

पंजाबराव डख यांनी दिलेला अंदाज खालीलप्रमाणे… 👇
मराठवाडा
दि. 25, 26, 28, 29, 30 रोजी गारपीट, वारा, विजांचा कडकडाट आणि पाऊस पडेल, अंश बदलत राहतील.

पूर्व विदर्भ
दि. 21, 22, 23, 24, 25, 26, 28, 29 तारखेला काही ठिकाणी पाऊस पडेल, काही ठिकाणी वारे तर काही ठिकाणी गारपीट होईल.

उत्तर महाराष्ट्र
दि. 22, 26, 27, 28, 29, 30 या तारखेला वारा, गारपीट आणि पाऊस पडेल.

दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्र
दि. 26, 27, 28, 29, 30 रोजी गारपीट, विजांचा कडकडाट आणि पाऊस पडेल.

पश्चिम-विदर्भ-
25, 26, 26, 28, 29, 30 रोजी काही भागात गारपीट होईल. जिथे वारा असेल तिथे पाऊस पडेल,असा हवामान बदलाचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या